Operation Tiger: ‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीने हा निर्णय’, बंडखोर खासदारांनी पत्रात काय म्हटलंय?

Shivsena UBT Letter to Om Birla: बंडखोर खासदारांनी ओम बिर्ला यांच्यासमोर मांडली 'ही' कायदेशीर भूमिका
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Published on
Updated on

Operation Tiger Shivsena UBT Mp Letter

पुढारी वृत्तसेवा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आम्ही घेतलेल्या विलीनकरणाच्या निर्णयाला मान्यता दिली असल्याने आम्हाला शिवसेना उबाठाचा पक्षादेश लागू होत नसल्याची भूमिका बंडखोर खासदारांनी घेतली आहे. उबाठाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याची भीती असल्याने आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा संभाव्य निर्णय बाळासाहेब ठाकरे यांच्या काँग्रेसविरोधी विचाराला सोडून असल्याचे अध्यक्षाना सादर करण्यात आलेल्या चार पानांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यास शिंदेंचा दबदबा राष्ट्रीयस्तरावर वाढणार, काँग्रेससह ठाकरे-पवारांसमोर नवे आव्हान

काँग्रेसविरोध हा ठाकरे विचाराचा गाभा असल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका बंडखोर उद्धव गटातील खासदारांनी घेतलेली आहे. बुधवारी यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्राचा तपशीलखात्रीलायक सूत्रांनी 'पुढारी'ला सांगितला. शिवसेना उबाठाने गेल्या काही दिवसात केलेली विधाने लक्षात घेता हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चिन्हे दिसत आहेत. आम्हाला काँग्रेसमध्ये विलीन व्हायचे नसल्याने आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत. शिवसेना शिंदे यांच्यात विलीन होण्याचा निर्णय घेत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Opertaion Tiger: एकनाथ शिंदे - पाटील भेटीने ‌‘ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा

पत्रावर सहा खासदारांच्या सह्या असल्याचेही समजते. दहाव्या सुचितील दोन तृतीयांश बहूमताची अट पूर्ण करीत आम्ही शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होतो आहोत असेही या पत्रात लिहिण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांनी विलीन व्हावे असा एक प्रचार सुरू झाला होता या प्रचाराचा आधार घेत उभा ठाणे विलीन होण्याचे ठरवल्यास आम्हाला काँग्रेसची राजकारण करायचे नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे या पत्रातील अन्य तपशील देखील महत्त्वाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news