ISIS Connection Case : 'ऑपरेशन सिंदूर'चा नकाशा 'इसिस'ला पाठवणारे दोन अल्पवयीन छत्तीसगडमध्ये ताब्यात

मुले 'ISIS'च्या टार्गेटवर, 'ऑपरेशन सिंदूर'चा नकाशा इसिस ला पाठविण्‍याचा आरोप
ISIS Connection Case
(File Photo)
Published on
Updated on

'Operation Sindoor' map sent to ISIS

रायपूर : छत्तीसगडमधील दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दहावी आणि अकरावीत शिकणारे हे दोन्ही उच्च माध्यमिक विद्यार्थी दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'(ISIS) हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. त्यांना ऑनलाइन माध्यमातून कट्टरपंथी सामग्रीद्वारे पद्धतशीरपणे भडकावले जात होते.

एटीएसने केला गुन्‍हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन शस्त्रे उचलण्यास तयार होते आणि त्यांनी हँडलर्सना “ऑपरेशन सिंदूर” संबंधित नकाशाची एक क्लिपिंग (नमुना) पाठवली होती. एटीएसने त्यांच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (UAPA), १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलांचे कुटुंब तपास यंत्रणांना सहकार्य करत असून, त्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी पाऊले उचलली जात आहेत, असे छत्तीसगड एटीएसने स्‍पष्‍ट केले आहे.

ISIS Connection Case
ISIS Thane Connection: ‘प्रोजेक्ट मुस्तफा’चे ठाणे कनेक्शन; इसिस मॉड्यूलमागे स्थानिक तरुणांचा सहभाग असल्याचे उघड, नवे धागेदोरे समोर

प्रकरण कसे आले उघडकीस?

एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह सोशल मीडियावरील तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले. देखरेखीदरम्यान अधिकाऱ्यांना आयएसआयएसशी जोडलेला एक गोपनीय इंस्टाग्राम ग्रुप आढळला. पाकिस्तानी हँडलर्स कट्टरपंथी सामग्री अपलोड करत होते. हे दोन भारतीय अल्पवयीन मुले या ग्रुपमध्ये सक्रिय सहभागी होते.गेल्या दीड वर्षांपासून एटीएसने या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवले होते. डिजिटल देखरेख टाळण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्स वारंवार ग्रुप्स बदलत असत. ग्रुपमध्ये जास्त ट्रॅफिक आढळले किंवा यंत्रणांची पाळत असल्याचा संशय आला, तर तो ग्रुप अचानक डिलीट केला जात असे.

ISIS Connection Case
Pune Isis Module Case : पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणी NIA चा मोठा निर्णय; 4 वॉंटेड आरोपींवर लाखोंचे बक्षिस जाहीर

डिजिटल प्रशिक्षण आणि डार्क-वेबचा वापर

या अल्पवयीन मुलांना "डिजिटल मॉड्यूल" द्वारे प्रशिक्षण दिले जात होते. यामध्ये डार्क वेब, टीओआर (TOR), व्हीपीएन (VPN) आणि बनावट आयपी ॲड्रेस यांसारख्या तंत्रांचा समावेश होता. ही सर्व तंत्रे कट्टरपंथी ऑनलाइनच्‍या माध्‍यमातून पुरवली जातहोती. कायदा अंमलबजावणी संस्थांना त्यांचा मागोवा घेणे शक्य होऊ नये यासाठी हे प्रशिक्षण दिले जात होते.भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, पाकिस्तानी हँडलर्सनी अल्पवयीन मुलांशी संपर्क वाढवला. याच दरम्यान, भारताचे “ऑपरेशन सिंदूर” आणि दोन्ही देशांनी लादलेली 'मीडिया ब्लॅकआऊट'ची परिस्थिती होती. या माहितीच्या दरीचा फायदा घेत हँडलर्सनी मुलांना सक्रिय केले आणि त्यांना हवाई हल्ल्यांच्या नकाशांच्या क्लिपिंग्स भारतीय वृत्तवाहिन्यांकडून मिळवून पाकिस्तानला पाठवण्याची सूचना केल्‍याचेही तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

ISIS Connection Case
Sonam Wangchuk Pakistan Connection : सोनम वांगचुक यांचं पाक कनेक्शन.... लेह पोलिसांकडून चौकशी सुरू

सोशल मीडिया, गेमिंगच्‍या माध्‍यमातून ओढले जाळ्यात

दशतवाद्‍यांनी अल्‍पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याची ही प्रक्रिया हळूहळू आणि काळजीपूर्वक आखली गेली होती. सुरुवातीला मुलांना प्रेरणादायक आणि सौम्य धार्मिक सामग्रीसह लक्ष्य केले गेले. कालांतराने, त्यांना हिंसक व्हिडिओ, कट्टरपंथी संदेश आणि जिहादी ऑडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या. गुप्त ग्रुप्स आणि बनावट खात्यांमधून मुलांना सतत ॲटिव्‍ह ठेवले. सोशल मीडियाव्यतिरिक्त, गेमिंग प्लॅटफॉर्मचाही भरतीसाठी वापर करण्यात आला. अनेक ऑनलाइन गेम्स, विशेषत: शूटिंग किंवा मिशन-आधारित गेम्समध्ये खाजगी चॅट रूम्स असतात. पाकिस्तानी हँडलर्सनी या चॅनेल्सचा वापर केल्‍याचेही तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

ISIS Connection Case
ISIS Terrorist Arrest: देशात हल्ल्याचा कट; ईसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक

तपास आणि कुटुंबाचा सहभाग

छत्तीसगड एटीएसने अल्पवयीन मुलांच्या कुटुंबांना चॅट लॉग्स, स्क्रीनशॉट्स, हिंसक सामग्रीचे पुरावे आणि हँडलर्ससोबतच्या संवादाचे रेकॉर्ड दिले आहेत. आपले मुले एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टरपंथी कार्यात गुंतलेले आहेत हे पाहून कुटुंबांना धक्का बसला.आरोपी अल्पवयीन असल्याने, बाल न्याय कायद्यांतर्गत तपास सुरू आहे. मुलांवर कोणताही मानसिक दबाव येऊ नये म्हणून पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली जात आहे. त्यांना समाजात पुन्हा सामील होण्यासाठी मानसिक समुपदेशन दिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news