Operation Sindoor: पाकिस्तानचा ड्रोन-मिसाइल हल्ला उधळून लावला; भारतातील 15 शहरात हल्ल्याचा प्रयत्न

Operation Sindoor: भारताच्या रशियन बनावटीच्या S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड ने सर्व ड्रोन आणि मिसाइल निष्क्रीय केले
S-400 system and drone attack
S-400 system and drone attackPudhari
Published on
Updated on

India's S-400 system neutralizes Pakistan's drone missile attack

नवी दिल्ली : पाहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर, पाकिस्ताननं भारतातील 15 लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न केला.

मात्र भारताने वेळेत प्रत्युत्तर देत हा हल्ला अपयशी ठरवला आणि लाहोरमधील पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला निष्क्रिय केले.

S-400 आणि 'काउंटर UAS ग्रिड'ने हल्ला परतवला

भारत सरकारने दिलेल्या निवेदनानुसार, 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तानने अवंतीपूरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, भुज, लुधियाना यांसह 15 ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र भारताच्या रशियन बनावटीच्या S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड ने सर्व ड्रोन आणि मिसाइल निष्क्रीय केले.

S-400 system and drone attack
Operation Sindoor अजुनही सुरूच! आत्तापर्यंत 100 दहशतवाद्यांचा खात्मा...

पाकिस्तानची कबुली: ड्रोन कोसळले, जवान जखमी

पाकिस्तानने स्वतःच्या निवेदनात कबूल केलं की लाहोरजवळ एक ड्रोन कोसळला आणि इतर 12 ड्रोन गुजरनवाला, चकवाल, बहावलपूर, कराची, चोर, रावळपिंडी आणि अटॉक जवळ नष्ट झाले. यात लाहोरमध्ये 4 जवान जखमी, तर सिंधमधील मियानो भागात एका नागरिकाचा मृत्यू झाला.

लाहोरमध्ये स्फोटांची मालिका, एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त गुरुवारी लाहोरमध्ये जोरदार स्फोट झाले. हे स्फोट वॉल्टन विमानतळाजवळ ऐकू आले.

भारतीय लष्कराने लाहोरमधील HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीच्या युनिट्सना लक्ष्य केलं, जी चीनच्या मदतीने विकसित करण्यात आली होती. या हल्ल्यामुळे लाहोरमधील पाक लष्कराची हवाई सुरक्षा व्यवस्था कोलमडली, असं सूत्रांनी सांगितलं.

ऑपरेशन सिंदूर 

बुधवारी भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. या कारवाईत 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

IAF ने राफेल विमानांतून 'एअर टू सर्फेस' मिसाइल हल्ले केले, तर लष्कराने 'सर्फेस टू सर्फेस' मिसाइल्स वापरल्या. सरकारने स्पष्ट केलं की, पाकिस्तानी लष्कराच्या संरचनेवर कोणताही हल्ला करण्यात आलेला नाही आणि केवळ दहशतवादी तळांवरच लक्ष केंद्रित करण्यात आलं.

S-400 system and drone attack
Operation Sindoor: भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये SCALP आणि HAMMER शस्त्रास्त्र निवड का योग्य ठरली?

शहबाज शरीफ म्हणतात ही युद्धजन्य कृती

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याला "भारताकडून लादलेली युद्धजन्य कृती" म्हटलं आहे. भारताने पुरावे सादर करून दहशतवादी तळांचे व्हिज्युअल दाखवले, मात्र पाकिस्तानने हल्ल्यात महिला आणि मुलांचा बळी गेल्याचा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news