Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीतील ‘अपप्रचारा’चा डाव उधळला : OpenAIचा दावा

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीतील ‘अपप्रचारा’चा डाव उधळला : OpenAIचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्‍या सातव्‍या टप्‍प्‍यासाठी आज मतदान होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया आज सायंकाळी सहा वाजता पार पडले. यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. अशातच या निवडणुकीत एका इस्रायल-आधारित नेटवर्कने कृत्रिम प्रज्ञेचा (artificial intelligence ) वापर करून लोकसभा निवडणुकात सत्ताधारी भाजपवर टीका तर काँग्रेसचे प्रशंसा करणाराचा प्रयत्‍न झाल्‍याचा खळबळजनक दावा चॅटजीपीटी-निर्माता ओपनएआय या अग्रगण्य कंपनीने केला आहे. तसेच भारतीय निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेल्या गुप्त मोहिमांमध्ये AI चा फसवा वापर थांबवण्यासाठी २४ तासांच्या आत कारवाई करत निवडणूक प्रचार काळात एखाद्‍या विशिष्‍ट राजकीय पक्षाचा अपप्रचाराचा डाव उधळण्‍याचेही कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे.

ओपनएआयने आपल्या वेबसाइटवरील अहवालात म्हटले आहे की, भारतीय निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेल्या गुप्त मोहिमांमध्ये एआयचा फसवा वापर रोखण्यासाठी २४ तासांच्या आत कारवाई करण्‍यात आली. याचा परिणाम असा झाला की त्याचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली नाही.

Lok Sabha elections : मोहिम कशा प्रकारे राबविण्‍याचा हाेता प्रयत्‍न?

OpenAI ने स्‍पष्‍ट केले आहे की, भारतातील लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्‍यासाठी इस्रायलमधील राजकीय मोहीम व्यवस्थापन कंपनी STOIC द्वारे नेटवर्क चालवले जात होते.या कंपनीने झिरो झेनो नावाने ही मोहीम चालवली होती. या अंतर्गत गाझा संघर्ष तसेच भारतीय निवडणुकांवर काही साहित्य तयार करण्यात आले. यासाठी ओपनएआयच्या भाषा मॉडेलचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. यामधील टिप्पण्या, लेख, सोशल मीडिया प्रोफाइल तयार करण्‍यात आले होते. या कंपनीने सत्ताधारी भाजप पक्षावर टीका तर विरोधी काँग्रेस पक्षाची प्रशंसा करण्‍याचा हा सर्व प्रयत्‍न होता.या सारा खटाटोप सार्वजनिक मतांमध्ये फेरफार करण्यासाठी किंवा राजकीय परिणामांवर प्रभाव टाकण्यासाठी केला गेला होता."

संबंधित नेटवर्कने मे महिन्यात भारतावर केंद्रित भाष्य तयार करण्यास सुरुवात केली, सातत्‍याने सत्ताधारी भाजपवर टीका केली आणि विरोधी काँग्रेस पक्षाची प्रशंसा केली. मात्र या चुकीच्‍या प्रचाराला आम्‍ही २४ तासांच्‍या आत आटोक्‍यात आणला.

Lok Sabha elections : 'त्‍या' खात्‍यांच्‍या ग्रुपवर बंदी

'ओपनएआय'ने म्‍हटलं आहे की, "भारतीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्‍यासाठी वापरण्‍यात आलेल्‍या इस्त्रायल-ऑपरेट केलेल्या खात्यांच्या गटावर बंदी घातली आहे. या मोहिमेद्वारे कॅनडा, युनायटेड स्टेट्स आणि इस्रायलमधील लोकांना इंग्रजी आणि हिब्रू भाषेतील सामग्रीद्वारे लक्ष्य करण्यात आले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला, इंग्रजी भाषेतील सामग्रीद्वारे भारतातील लोकांना लक्ष्य करण्‍याचा प्रयत्‍न झाला."

हे लोकशाहीसाठी धोकादायक : भाजप

ओपनएआयच्‍या रिपोर्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, "हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी अत्‍यंत धोकादायक आहे. असा अजेंडा भारतात आणि देशाबाहेर निहित स्वार्थासाठी चालवला जात आहे. याची सखोल चौकशी करून पर्दाफाश होणे गरजेचे आहे."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news