Online gaming मुलांच्‍या जीवाशी 'खेळ'च, नवीन रिपोर्ट काय सांगतो?

गेमिंगशी संबंधित वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे लठ्ठपणा-संबंधित समस्यांवर उपचार घेणाऱ्या तरुणांची संख्या अंशतः वाढली

online gaming children risk
प्रातिनिधिक छायाचित्र.File photo
Published on
Updated on

online gaming children risk

नवी दिल्‍ली : सेंकदा सेकंदाला वाढणारा थरार... सतत जिंकण्‍यासाठी आभासी दुनियेतून दाखवली जाणारे आमिषे... देहभान विसरुन जिंकण्‍यासाठीची पराकोटीच धडपड... हे सारं काही ऑनलाईन गेमिंगची सफरीमध्‍ये सर्वांनाच अनुभवता येते. त्‍यामुळेच अल्‍पावधीत जगभरात ऑनलाईन गेमिंगची एक मोठी इंडस्‍ट्रीच तयार झाली आहे. या आभासी दुनियेत आज कोट्यवधी मुले अडकत असल्‍याने नवीन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ऑनलाईन गेमिंगचा परिणाम थेट मुलांच्‍या आरोग्‍यावर होत असून, या गेमिंगच्‍या व्‍यसनामुळे शोषणही वाढले आहे, असे 'सायबरपीस' (CyberPeace) च्या अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम

लहान वयातच लहान वयातच ऑनलाइन गेमिंगच्या संपर्कात आल्याने मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. लहान मुलांवर ऑनलाइन गेमिंगच्या लवकर झालेल्या संपर्काचा नकारात्मक परिणाम हा चिंतेचा विषय बनत चालला आहे," असे अहवालात नमूद केले आहे.


online gaming children risk
Hafiz Saeed Terror plot : 'मोस्ट वाँटेड' हाफिज सईदचा कुटील डाव! बांगलादेशचा वापर करत रचला भारतावर हल्ल्याचा कट

आरोग्याच्‍या विविध समस्या

'पीच' (PEACH - Personal and Environmental Associations with Children's Health) प्रकल्पाने केलेल्या एका दीर्घकाळ चाललेल्या अभ्यासानुसार, ज्या मुलांचा स्क्रीन टाइम जास्त असतो, त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) अधिक असतो आणि त्यांचे वजन जास्त असण्याची शक्यता असते. अति प्रमाणात गेमिंगमुळे बैठी जीवनशैली वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि संबंधित आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ऑनलाईन गेम्स खेळण्यात अधिक वेळ घालवणाऱ्या किशोरवयीन मुलांना शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे लठ्ठपणा होण्याची शक्यता जास्त असते. गेमिंगशी संबंधित वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे लठ्ठपणा-संबंधित समस्यांवर उपचार घेणाऱ्या तरुणांची संख्या अंशतः वाढली असल्‍याचेही या रिपोर्टनमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.


online gaming children risk
Fake currency : १०० डॉलरची नोट खरी की बनावट? न्‍यायालयात ३८ वर्ष चालली केस...हायकोर्टाने दिला महत्त्‍वपूर्ण निर्णय

शरीरावर अत्‍यंत घातक परिणाम

सतत गेमिंग केल्याने पुनरावृत्तीमुळे 'कार्पल टनेल सिंड्रोम' (carpal tunnel syndrome) होऊ शकतात, कारण सतत माऊस क्लिक करणे किंवा कंट्रोलर वापरल्याने हात आणि मनगटावर दबाव येतो. ऑनलाइन गेमिंगचे व्यसनाधीन स्वरूप झोपेच्या पद्धती (sleep patterns) विस्कळीत करू शकते. याशिवाय, अति गेमिंगचा संबंध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांशी (cardiovascular problems) असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.


online gaming children risk
Tirupati laddoo row: तिरुपती लाडू प्रसादासाठी उत्तराखंडमधील डेअरीने दुधाशिवाय २५० कोटी रुपयांचे तूप कसे पुरवले?

मानसिक आरोग्‍यावरही गंभीर परिणाम

अहवालात स्पष्ट केले आहे की, अति गेमिंगचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम केवळ एकांत आणि सामाजिक माघार यापुरते मर्यादित नाहीत, तर भावनिक आणि मानसिक कल्याणासाठी गंभीर समस्या निर्माण करतात.


online gaming children risk
Study habits: विद्यार्थ्यांनो, अभ्यासाच्या सवयी बिघडवणाऱ्या या ७ गोष्‍टी टाळाच

'या' उपायोजनांची केली शिफारस

  • रिपोर्टमध्‍ये ऑनलाईन गेमिंगचे मुलांवर होणार्‍या गंभीर परिणामाची चर्चा केली आहे. त्‍याचबरोबर धोके कमी करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस केली आहे.

  • वयाच्या पडताळणीची स्पष्ट पद्धत : 'डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट, 2023' मध्ये ऑनलाईन गेमिंगसाठी पडताळणीची सक्ती आहे; पण अंमलबजावणीबद्दल स्पष्टता नसल्याने यासाठी स्पष्ट पद्धतीची मागणी करण्यात आली आहे.

  • सामग्री नियमन : हिंसा, लैंगिकता आणि प्रौढ थीमसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असावीत. सामग्रीचे मूल्यांकन करण्यासाठी भारताकडे 'PEGI' (पॅन युरोपियन गेम इन्फॉर्मेशन) समतुल्य संस्था नाही, असेj[ अहवालाने नमूद केले आहे.

  • रेटिंगचा विस्तार : हिंसा, रक्तपात आणि लैंगिक सामग्रीसारख्या श्रेणींमधील विविध स्तरांचा समावेश करण्यासाठी सामग्री रेटिंगचा विस्तार करण्याचा सल्ला दिला आहे.

  • 'लिव्हिंग लेजिस्लेशन' फ्रेमवर्क : 'लिव्हिंग लेजिस्लेशन' (काळासोबत बदलणारे कायदे) फ्रेमवर्क प्रस्तावित केले आहे.

  • कायदेशीर छाननी : गेम रिलीज होण्यापूर्वी त्याच्या सामग्रीची कायदेशीर छाननी व्हावी. मुलांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका समान नियमावलीखाली गेम डेव्हलपर्स आणि पब्लिशर्स दोघांनाही आणण्याची शिफारसही या अहवाला करण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news