पुढारी वृत्तसेवा
उत्तम अभ्यासाच्या सवयी यशाचा पाया रचतात; पण दररोज होणार्या काही लहान चुका प्रयत्नांना नकळतपणे निष्फळ ठरवतात.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बिघडवणाऱ्या सात गोष्टी जाणून घ्या.
अभ्यासाच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष करणे ही चूक टाळा. दररोज अभ्यासासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित वेळ केल्यास स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या सुधारते.
अभ्यास करताना एकाचवेळी अनेक कामे करणे टाळा. फोन, संगीत आणि नोट्स काढणे अशा एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने एकाग्रता नष्ट होते. अभ्यासावेळी फक्त अभ्यासच करा.
विश्रांती न घेता अभ्यास करणे ही चूक ठरते. लहान, नियमित ब्रेक घेतल्यास लक्ष पुन्हा केंद्रित होते.
नियमित उजळणी न करणे ही मोठी चूक ठरते. दररोज लहान भागांची उजळणी केल्याने स्मरणशक्ती मजबूत होते. परीक्षेवेळी ताण कमी होतो.
पुरेशी झोप न घेल्याने एकाग्रता बिघडते. पुरेशी, चांगली झोप स्मरणशक्तीसह कार्यक्षमता वाढवते.
जंक फूडमुळे एकाग्रता आणि ऊर्जा पातळी मंदावते. जंकफूड खाण्याची चूक टाळा.
व्यायाम टाळणे ही चूक ठरते. दिवसभर फक्त अभ्यास केल्याने शरीरात आळस निर्माण होतो. केवळ २० मिनिटांचा व्यायाम देखील मेंदूचे आरोग्य सुधारतो.