Indian smartphone manufacturing | चारपैकी एक फोन भारतीय बनावटीचा!

बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देत स्थानिक कंपन्यांचे आश्वासक पाऊल
Indian smartphone manufacturing |
Indian smartphone manufacturing | चारपैकी एक फोन भारतीय बनावटीचा!
Published on
Updated on

नवी दिल्ली : बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देत स्थानिक कंपन्या उत्पादनात शांतपणे आपले स्थान बळकट करत आहेत. देशात तयार होणार्‍या चारपैकी एक फोन भारतीय कंपनीने तयार केलेला आहे. अगदी चिनी कंपन्याही स्थानिक कंपन्यांकडून आपली उत्पादने तयार करून घेत आहेत.

डिक्सन टेक्नॉलॉजी आणि भागवती प्रॉडक्टस् या कंपन्यांनी मोबाईल उत्पादनात आघाडी घेतली आहे. त्यातही 2025 मध्ये डिक्सन भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोनची उत्पादन कंपनी बनली आहे. डिक्सनने सर्वाधिक संख्येने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे उत्पादन घेण्यात सॅमसंग कंपनीला मागे टाकले आहे. डिक्सन देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची सेवा देणारी कंपनी ठरली आहे. त्यांचा बाजार हिस्सा 19 टक्के असून मोटोरोला, रिअलमी आणि शाओमी यांसारख्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. कंपनीच्या उत्पादनात 89 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

भारताच्या उत्पादनात 8 टक्क्यांनी वाढ

काऊंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार फॉक्सकॉन कंपनीचा बाजार हिस्सा 12 वरून 16 टक्क्यांवर गेला आहे. अ‍ॅपल कंपनीची निर्यात वाढल्याने त्यांचा बाजार हिस्सा वाढला आहे. सॅमसंग कंपनीचा बाजार हिस्सा 2024 मध्ये 20 टक्के होता. त्यात 18 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. विशेषतः निर्यात घटल्याने कंपनीने दोन टक्के बाजार हिस्सा गमावला आहे. भारताच्या स्मार्टफोन उत्पादनात 2025 मध्ये उत्पादनात 8 टक्क्यांनी वाढ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news