

नवी दिल्ली : ओडिशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोपालपूरच्या समुद्रकिनाऱ्यावर मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात १० आरोपींचा समावेश असून यापैकी ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना रविवारी संध्याकाळी बेरहामपूर शहराजवळील गोपालपूर बिचवर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार बीच ही महाविद्यालयीन मुलगी व तिचा मित्र बसले होते. दरम्यान एका निर्मनुष्य ठिकाणी १० अज्ञातांनी त्यांना गाठले व तिच्या मित्राला बांधून घातले या विद्यार्थीनीवर अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीतेने सोमवारी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणातील ८ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरु असून पुढील अधिक तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की . संबधीत पीडीत तरुणी व तिचा मित्र बेरहामपूर येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. ते दोघे गोपालपूर बिचवर एका निर्मनुष्य ठिकाणी बसले होते. त्याठिकाणी आरोपींनी प्रथम या दोघांचे फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीतेच्या मित्राला दुर नेऊन बांधून घातले व पिडीतेवर बलात्कार केला. दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहचले व त्यांनी तपास सुरु केला.
दरम्यान या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली असून या पिडीतेवरील बलात्काराची लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश ओडीसा प्रशासनाला दिले आहेत. महिला आयोगाच्यास अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ओडीसाचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहले अूसन या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे.