Corruption news: ५ आलिशान इमारती, १३ प्लॉट्स, कोट्यवधींची रोकड आणि सोनं! ६ हजार पगार असणाऱ्या सरकारी अभियंत्याच्या घरी छापा

अवघ्या ६ हजार रुपयांच्या मासिक पगारावर सरकारी सेवेत प्रवेश केलेल्या एका सरकारी अभियंत्याकडे सापडली करोडो रूपयांची संपत्ती.
Corruption news
Corruption newsFile Photo
Published on
Updated on

Corruption news Odisha

भुवनेश्वर: अवघ्या ६ हजार रुपयांच्या मासिक पगारावर सरकारी सेवेत प्रवेश केलेल्या एका सरकारी अभियंत्याकडे पाच बहुमजली इमारती, १३ मौल्यवान भूखंड, ३४१ ग्रॅम सोने, बँक ठेवींमध्ये ४५ लाख रुपये आणि तब्बल २.०४ कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या छापेमारीत ही मालमत्ता उघडकीस आली असून, तिचा तपास अद्याप सुरू आहे.

बैकुंठनाथ बेहेरा (वय ५२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा येथील इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून तो कार्यरत असून सध्या त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, तपास जसजसा पुढे जाईल तसतशी बेहेरा याच्या मालमत्तेची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Corruption news
Bribe Case Nashik | लाच घेतांना तलाठी जेरबंद, लाच लुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून त्याच्या बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या मालमत्तेचा शोध नऊ वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. या शोधमोहिमेदरम्यान, भुवनेश्वरमधील विविध मोक्याच्या ठिकाणी चार आलिशान घरे, तसेच जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा येथील पांडुआ येथे २,५०० चौरस फुटांची दुमजली इमारत आढळून आली. तपासादरम्यान सापडलेल्या १३ उच्च-मूल्य भूखंडांपैकी सात भुवनेश्वरमध्ये, पाच जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा येथे, तर एक भूखंड बारिपदा येथे असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित इमारती आणि भूखंडांचे मोजमाप व मूल्यांकन सुरू आहे. या मालमत्तेची अचूक किंमत मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकाच वेळी केलेली ही शोधमोहीम दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपाधीक्षक, सहा निरीक्षक आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे राबवण्यात आली. बेहेरा यांनी १६ ऑगस्ट १९९९ रोजी नबरंगपूर जिल्ह्यात कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्याचा मासिक पगार केवळ ६ हजार रुपये होता. यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्याची पदोन्नती होऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून बालीगुडा येथील ITDA मध्ये नियुक्ती करण्यात आली. तो आजपर्यंत त्याच पदावर कार्यरत आहेत. भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेकडून बेहेरा याच्या उत्पन्नाच्या स्रोतांची आणि मालमत्तेची सखोल चौकशी सुरू आहे.

Corruption news
Raigad Bribery Case : सातबारा नोंदीसाठी ३० हजारांची लाच घेणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news