Rape Case : कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार; काँग्रेस नेत्याला अटक

Odisha student rape case : पीडित अभियांत्रिकी विद्यार्थिनीने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. तिथे हा सर्व प्रकार घडला.
Odisha student rape case
Odisha student rape casefile photo
Published on
Updated on

भुवनेश्वर : १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भुवनेश्वरमधील मंचेश्वर पोलिसांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या ओडिशा युनिटचे अध्यक्ष उदित प्रधान यांना अटक केली आहे. प्रधान यांना रविवारी रात्री उशिरा त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

पीडितेने पोलिसांना सांगितली संपूर्ण घटना

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १८ मार्च रोजी घडली. पीडितेने सांगितले की, ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत भुवनेश्वरच्या मास्टर कॅन्टीन परिसरात प्रधान यांना भेटली होती. त्यानंतर ते सर्वजण प्रधान यांच्या गाडीतून नयापल्ली येथील एका हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये, गटातील इतरांनी मद्यपान केले, मात्र पीडितेने मद्यपान करण्यास नकार दिला. तेव्हा प्रधान यांनी तिला एक शीतपेय दिले. या पेयात गुंगीचे औषध मिसळले असल्याचा आरोप तिने केला आहे. ते प्यायल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली आणि तिने घरी सोडण्याची विनंती केली. मात्र, प्रधान आणि इतरांनी तिला हॉटेलमधून जाऊ दिले नाही. ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही प्रधान यांनी दिल्याचे तिने म्हटले आहे.

Odisha student rape case
Sambhajinagar Crime News : सावत्र बापाचा दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; जन्मदाती आईही बनली वैरीण

आधी भीती वाटत असल्याने आपण तक्रार केली नाही, असे सांगत पीडितेने काही महिन्यांनंतर पोलिसांत धाव घेतली. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रधान यांना अटक केली. प्रधान यांच्या अटकेची माहिती पसरताच, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी काँग्रेसच्या समर्थकांसह मंचेश्वर पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. या आरोपांनंतर राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (NSUI) उदित प्रधानला तात्काळ संघटनेतून निलंबित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news