

सध्या सोशल मीडिया गाजतो आहे ते महाकुंभ मेळयाच्या फोटो आणि व्हिडियोनी. यावर योगगुरु रामदेवबाबांनी आक्षेप घेतला आहे. या अशा सगळ्या गोष्टी महाकुंभ मेळ्याच्या मूळ हेतूला धक्का लावतात. हे म्हणत रामदेवबाबांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय त्यांच्या ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर होण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. पत्रकारांशी याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘ संतपद असे एका रात्रीत मिळत नाही. यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या गरजेची असते.’ पुढे ते म्हणतात, कोणी महामंडलेश्वर बनले आहेत. तर अलीकडे कुणाच्याही नावापुढे बाबा जोडलेले आहे. कुंभची सत्यता ही आहे की यातून मनुष्याने मोक्षप्राप्तीचा रस्ता उघडावा. पण कुंभमध्ये बनवले जाणारे रील्स, व्हिडियो यामुळे त्याचे महत्त्व कुठे तरी कमी झाल्यासारखे वाटते आहे.
सनातन धर्म हा इतक्या पुरताच मर्यादित नाही. त्यामुळेच इतक्या सहज ही पदवी मिळणं दुरापास्त आहे. 50-50 वर्ष तप केल्यावर मग कुठे जाऊन संतपदांपर्यंत पोहोचता येते.
अलीकडेच महाकुंभ मेळयात अभिनेत्री ममता कुलकर्णीने ममताने त्रिवेणी आखडयात स्नान करून किन्नर आखड्याची महामंडलेश्वर बनली आहे. तिच्या या निवडीनंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.