दोन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट : नितीन गडकरी

दोन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  पुढील दोन वर्षांच्या कालावधीत रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी दिली. ते येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. रस्ते सुरक्षा ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, रस्ते विषयाशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाने याबाबत संवेदनशील होणे आवश्यक आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले.

रस्ते सुरक्षा हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. ज्या ठिकाणी सतत अपघात होतात, अशा 'ब्लॅक स्पॉटस' संदर्भात तातडीने उपाय योजले जात आहेत. परिवहन खात्याच्या सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तसेच प्रकल्प संचालकांनी अपघात होऊ नयेत, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा दृढ निश्चय केला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या वतीने (सीआरआरआय) विकसित करण्यात आलेल्या 'मोबाईल कोल्ड मिक्सर कम पेव्हर अँड पॅचफिल' मशीनचे कार्यान्वयन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या मशिनद्वारे केवळ एका तासात १२ ते १५ मध्यम आकाराचे रस्त्यावरचे खड्डे मजबूत रीतीने भरले जाऊ शकतात.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news