खलिस्तानी, गँगस्टरविरोधात एनआयएची सहा राज्यांत छापेमारी

खलिस्तानी, गँगस्टरविरोधात एनआयएची सहा राज्यांत छापेमारी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  खलिस्तानी आणि गँगस्टर यांच्या जाळ्याविरोधात एनआयएने बुधवारी सकाळी सहा राज्यांत एकाचवेळी छापेमारी केली. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातील 51 ठिकाणी एनआयएने छापे टाकले. ही कारवाई लॉरेन्स, बंबीहा आणि डल्ला गँग साथीदारांच्या संबंधित अड्ड्यांवर केली जात आहे.

पंजाबच्या फिरोजपूरमधून खालिस्तानी दहशतवादी अर्श डल्ला याचा निकटवर्तीय जोरा सिंग याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या मोबाईलमधून तो अर्श डल्लीशी चॅटिंग करत असल्याचे पुरावे मिळाले आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधून एका संशयिताला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. एनआयएने पंजाबमधील सुमारे 30 आणि हरियाणातील 4 ठिकाणी छापेमारी केली आहे. उत्तर प्रदेशातील पिलिभीत, लखीमपूर खिरी, अलिगढ आणि सहारनपूरमध्ये एनआयएने छापे टाकले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू असताना एनआयएने कारवाई केली आहे. पंजाबमधील फिरोजपूर, भठिंडा, लुधियाना, मोगा, पतियाळा, बर्नला, फरीदकोट आणि मानसामध्ये छापे टाकले आहे. गुरप्रीत सिंग ऊर्फ गुरी यांच्या घरात शोध मोहिम राबवली. भठिंडामध्ये अनेक वाँटेड आरोपी आहेत.

उत्तराखंडातील उधमसिंहनगरातील बाजपूरमध्ये एनआयएने छापे टाकले आहे. तेथील धंसारा गावात शकली अहमदच्या घराची तपासणी करण्यात असून तो एक गन चालवत असल्याचे समोर आले आहे. अहमदवर खलिस्तानवाद्यांना अवैधरित्या हत्यारे पुरवत असल्याचा आरोप आहे.काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील 10 पेक्षा अधिकजिल्हांना खलिस्तानवाद्यांनी आपल्या नकाशात दाखवले. होते. त्यामुळे एनआयएने राजस्थानमधील 13 जिल्ह्यात छापे टाकले. गेल्या सात दिवसांत खलिस्तानी नेटवर्कविरोधात दुसरी मोठी कारवाई केली आहे.

लागेबांधे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

फतेहाबादमधील भडोलावाली गावात एनआयएने छापे टाकले आहेत. हे गाव पंजाब सीमेला लागून आहे. या गावातील एका संशयिताच्या घरावर छापा टाकला असून तो शस्त्र तस्करशी संबंधीत आहे. एनआयएने ही कारवाई खलिस्तानी दहशतवादी, ड्रग्ज डिलर्स आणि गँगस्टर मिलिभगत तोडण्यासाठी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news