Pakistani Spy | पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा 'CRPF'चा सहाय्यक उपनिरीक्षक जेरबंद

'एनआयए'ची दिल्‍लीत कारवाई, २०२३ पासून गोपनीय माहिती पुरवत असल्‍याचा आरोप
Pakistan Spy
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर देशातील विविध राज्‍यांतील पाकिस्तानी हेरांचा पर्दाफाश होत आहे. (Pakistani Spy) पाकिस्‍तानसाठी हेरगिरी करणार्‍या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्‍या (सीआरपीएफ) सहाय्यक उपनिरीक्षकाला अटक केली आहे. मोती राम जाट असे त्‍याचे नाव आहे. तो २०२३ पासून पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती देत ​​असल्याचे उघड झाले आहे. 'एनआयए'च्‍या कारवाईनंतर 'सीआरपीएफ'ने त्‍याला सेवेतून बडतर्फ केले आहे.

पाकिस्‍तानी गुप्‍तचर अधिकार्‍यांना पुरवली गोपनीय माहिती

'एनआयए'ने म्‍हटलं आहे की, आरोपी मोती राम जाट हा सीआरपीएफमध्‍ये सहाय्‍यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. हेरगिरीमध्‍ये तो सक्रिय होता. २०२३ पासून तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना (पीआयओ) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होता. याचा मोबदला म्‍हणून त्‍याने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून विविध मार्गांनी पैसा मिळवला होता.

विशेष न्यायालयाने सुनावली ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी

मोती राम जाट याला पटियाला हाऊस कोर्टातील विशेष न्यायालयात हजर करण्‍यात आले. न्‍यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. पाकिस्तानला गोपनीय माहिती देत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर सीआरपीएफने सोमवारी जाट याला सेवेतून बडतर्फ केले.

Pakistan Spy
CRPF jawan Pakistani wife | पाकिस्तानी तरूणीशी विवाह; CRPF जवान म्हणाला, मी तर...

पाकिस्‍तानसाठी हेरगिरी केल्‍याचा पर्दाफाश कसा झाला?

मोती राम जाट याच्‍या हालचाली संशयास्‍पद होत्‍या. यामुळे सीआरपीएफ कर्मचाऱ्यांनी केंद्रीय तपास संस्थांशी समन्वय साधून त्‍याच्‍या सोशल मीडियावरील संदेशाची तपासणी केली. यावेळी त्‍याने नियमांचे उल्‍लंघन केल्‍याचे आढळले, पुढील चौकशीसाठी त्याला राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आले. सीआरपीएफ नियमानुसा त्‍याा २१.०५.२०२५ पासून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे," असे सीआरपीएफने म्हटले आहे.

Pakistan Spy
छत्तीसगडच्या सुकमा येथे CRPF जवानाचा सहकाऱ्यांवरच गोळीबार

पाकिस्तानी हेरांवर धडक कारवाई

पहलगाममध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर देशभरातील विविध राज्‍यांना सतर्कचे आदेश देण्‍यात आले होते. मागील आठवड्यात, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील पोलिस दलांनी संवेदनशील माहिती लीक करण्यापासून ते बेकायदेशीर मार्गांनी गुप्तचर माहिती गोळा करण्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी नागरिकांशी संबंध ठेवण्यापर्यंतच्या आरोपांवर किमान १९ जणांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news