नवनिर्वाचित खासदार आता कोणालाही ‘लॉग इन आणि पासवर्ड शेयर करू शकणार नाही

नवनिर्वाचित खासदार आता कोणालाही ‘लॉग इन आणि पासवर्ड शेयर करू शकणार नाही
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचा आरोप झाल्यानंतर लोकसभा प्रशासनाने आता तांत्रिकदृष्ट्या खबरदारीच्या सक्षम उपाययोजना केल्या आहेत. नवनिर्वाचित खासदारांना लोकसभेतील आपले लॉग इन आणि पासवर्ड कोणालाही शेअर करता येणार नाही. त्यामुळे खासदारांच्या नावाने केले जाणारे उद्योग रोखणे शक्य होणार आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार निशीकांत दूबे यांनी लावला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खासदार महुआ यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात संसदेत प्रश्न उपस्थित करून दर्शन हिरानंदानी यांना लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दुबे यांनी केला होता.

हिरानंदानी यांनी त्यांच्या फायद्याचा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतील लॉग इन आणि पासवर्डचा वापर केल्याचे चौकशीत आढळून आले होते. या गंभीर प्रकरणात महुआ मोईत्रा यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी खासदार निशीकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यावरील चौकशीत मोईत्रा यांनी लोकसभेतील लॉग इन आणि पासवर्ड आपले जवळचे मित्र हिरानंदानी यांना शेअर केल्याचे मान्य केले होते. मात्र, संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला होता.

लोकसभा अध्यक्षांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी संसदेच्या इथिक्स कमिटीकडे सोपवली होती. या समितीने केलेल्या चौकशीत महुआ मोईत्रा यांना दोषी ठरवून त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणण्याची शिफारस केली होती. इथिक्स कमिटीच्या अहवालाच्या आधारावर मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

महुआ मोईत्रा प्रकरणामुळे लोकसभा सचिवालयाने खासदारांचे लॉग इन आणि पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या आधीच खबरदारी घेतली आहे. खासदारकीची शपथ घेताना कुठलीही गोपनीय माहिती दुसऱ्याला देणार नाही, असे वचन देऊन खासदारांना स्वाक्षरी करावी लागते. मात्र, तरीही मोईत्रा यांनी या शपथेचे उल्लंघन केले होते. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने नवनिर्वाचित खासदारांना त्यांचे लॉग इन आणि पासवर्ड दुसऱ्या कोणालाही शेअर करता येणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news