१८ कोटींचे इंजेक्शन मिळविले, यमराजाला हरविले !

१८ कोटींचे इंजेक्शन मिळविले, यमराजाला हरविले !

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  दिल्लीतील १८ महिन्यांचा कणव … स्पायनल मॉस्क्युलर ट्रोफी (टाईप १) या अत्यंत दुर्मीळ आजाराने पीडित… उपचारांसाठीचे इंजेक्शन होते १७.५ कोटी रुपयांचे… कसे व्हायचे? कणवचे वडील अमित जांगडा यांनी ऑनलाईन क्राऊडफंडिंग अभियान सुरू केले. बघता-बघता दीड लाख लोक पुढे आले.

कणवला 'झोल्गेन्समा' नावाचे जे इंजेक्शन लागणार होते, ते भारतात कुठेही उपलब्ध नव्हते. अमेरिकेतून मागवावे लागणार होते. कणव ७ महिन्यांचा होता तेव्हाच या आजाराचे निदान झाले होते. हा एक आनुवंशिक आजार असून, यात २ वर्षांपर्यंतच रुग्ण जिवंत राहू शकतो. बॉलीवूडमधील सोनू सूद, राजपाल यादव, फराह खान, विद्या बालन, शक्ती कपूर आणि कपिल शर्मा यांनीही या कार्यात मोलाचा वाटा उचलला.

अमेरिकन औषध कंपनीनेही १७.५ कोटी रुपयांचे हे इंजेक्शन १०.५ कोटी रुपयांत उपलब्ध करून दिले. केंद्र सरकारने आयातीवर कुठलाही कर लावला नाही. कणवला इंजेक्शन लागले. दीड लाख लोकांनी यथाशक्ती रक्कम दिली आणि त्यासाठीची रक्कम उभी राहिली. यमराजाचा जणू पराभवच या लोकांनी मिळून केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news