FabIndia च्या ‘जश्न-ए-रिवाज’ जाहिरातीवर नेटकरी संतप्त

FabIndia च्या ‘जश्न-ए-रिवाज’ जाहिरातीवर नेटकरी संतप्त

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपड्यातील नामवंत असणाऱ्या फॅब इंडियाना (FabIndia) ब्रॅण्डने 'जश्न-ए-रिवाज', नावाची जाहिरात आपल्या वेबसाईटवर टाकली आणि सोशल मीडियावर अनेकांनी फॅब इंडिया ब्रॅण्डला तीव्र विरोध केला. भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरून फॅब इंडियाला बायकाॅट करण्याचे आवाहन केलेले आहे.

फॅब इंडियाची (FabIndia) 'जश्न-ए-रिवाज'ची जाहिरात पाहून भाजप नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी असल्या जाहिरातींमध्ये हिंदू धर्माची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे फॅब इंडियाला मोठा तोटा सहन करवा लागणार आहे. जाहिरातीला होत असलेला विरोध पाहून फॅब इंडियाने ही जाहिरात मागे घेतलेली आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी फॅब इंडियाच्या जाहिरातीवर आक्षेप नोंदविले आहेत. गरज नसताना दिवाळी सणाच्या पार्श्नभूमीवर कंपनीने हिंदू सणाला मुस्लीम विचारधारेशी जोडलेले आहे, असे मत विरोधकांना मांडले आहे. तेजस्वी सूर्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "हिंदू सणाची मुद्दामहून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे."

"जाहिरातीतील ज्या माॅडेल्सनी पारंपरिक हिंदू पोशाख घातल्याचं दिसून येत नाही. ही जाहिरात मागे घ्यावी लागेल. फॅब इंडियाला त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागेल", तेजस्वी सूर्या यांच्या ट्विटनंतर #BycottFabIndia असा ट्रेण्ड सुरू झाला. हे पाहता कंपनीने ही जाहिरात काढून वेबसाईटवरून काढून टाकली आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरच्या कस्तुरी सावेकरने सर केले मनस्लू शिखर…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news