Reels आणि Vlogs बनवणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ देशाच्या सरकारने भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून मागवले अर्ज

भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, व्लॉगर्स आणि पॉडकास्टर्सना आपल्या देशातील सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशाची ओळख करून देण्यासाठी नेपाळ सरकारने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Nepal tourism influencer trip
Nepal tourism influencer tripfile photo
Published on
Updated on

Nepal tourism influencer trip

नवी दिल्ली: भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, व्लॉगर्स आणि पॉडकास्टर्सना आपल्या देशातील सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशाची ओळख करून देण्यासाठी नेपाळ सरकारने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. नवी दिल्लीतील नेपाळ दूतावासाने यासाठी ‘फॅमिलरायझेशन ट्रिप टू नेपाळ’ या कार्यक्रमांतर्गत अर्ज मागवले आहेत.

या उपक्रमांतर्गत भारतातील पाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटर्सची नेपाळ दौऱ्यासाठी निवड केली जाणार आहे. या क्रिएटर्सना नेपाळचे सौंदर्य, आध्यात्मिक स्थळे, सांस्कृतिक वारसा आणि प्रमुख पर्यटन स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील आणि त्यावर आधारित डिजिटल कंटेंट तयार करावा लागेल.

Nepal tourism influencer trip
Digital Arrest Scam : सावधान! 'डिजिटल अरेस्ट'साठी वापरलेली ९,४०० व्हॉट्सॲप खाती बॅन; कंबोडियातून चालत होतं रॅकेट

नेपाळ दूतावासाकडून अधिकृत घोषणा

नेपाळ दूतावासाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय पर्यटकांमध्ये नेपाळची प्रतिमा एक जवळचे, सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून नेपाळमधील पर्वत, सरोवरे, मंदिरे, स्तूप, स्थानिक सण-उत्सव, संस्कृती आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती भारतीय पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याता उद्देश आहे. यामध्ये प्रामुख्याने नेपाळमधील आध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटनाचा प्रचार केला जाईल.

दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, निवडलेल्या क्रिएटर्सना या नेपाळ दौऱ्यादरम्यान व्हिडिओ, रील्स, शॉर्ट्स, स्टोरीज, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया पोस्ट तयार कराव्या लागतील. या कंटेंटमध्ये नेपाळच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्यासोबतच भारतीय पर्यटकांना प्रवासासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती देणे आवश्यक असेल. तसेच, भारतीय पर्यटकांना नेपाळला भेट देण्यासाठी प्रेरित करेल, असा किमान एक अनुभव क्रिएटर्सना शेअर करावा लागेल. या कंटेंटला योग्य क्रेडिट देऊन दूतावास आपल्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर देखील प्रसिद्ध करू शकते.

पात्रतेचे निकष काय आहेत?

अर्जदार हा भारतीय नागरिक किंवा भारतात कार्यरत असणारा डिजिटल कंटेंट क्रिएटर असावा. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय असावा. ट्रॅव्हल, संस्कृती, अध्यात्म, लाइफस्टाइल, अ‍ॅडव्हेंचर, वेलनेस, फूड किंवा हेरिटेज या विषयांवर कंटेंट बनवणाऱ्यांना प्राधान्य असेल. अर्जदाराचे सोशल मीडिया नेटवर्क मजबूत असावे आणि तो दर्जेदार व्हिडिओ किंवा व्लॉग बनवण्यात सक्षम असावा. कंटेंटचा दर्जा, ऑडियन्स रीच, एंगेजमेंट, स्टोरीटेलिंगची शैली आणि व्यावसायिक प्रतिमा या आधारावर निवड केली जाणार आहे. हिंदी, इंग्रजी किंवा इतर भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये प्रभावी संवाद साधणाऱ्या क्रिएटर्सना प्राधान्य दिले जाऊ शकते.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ३० मे २०२६ पर्यंत नेपाळ दूतावासाच्या eonnewdelhi@mofa.gov.np या ईमेल आयडीवर पाठवावे लागतील. दौऱ्याची तारीख, वेळापत्रक आणि इतर व्यवस्थांची माहिती केवळ निवडलेल्या क्रिएटर्सनाच दिली जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Nepal tourism influencer trip
Pune Restaurant: जेवणाच्या मेन्यूसाठी QR कोड स्कॅन करताय? सावधान! पुण्यातील तरुणीचा अनुभव ऐका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news