NEET Paper Leak : नीट पेपरफुटीचे कारस्थान काही महिन्यांपूर्वी रचले होते, एनटीएचे तज्ञ पेपर तयार करताना प्रश्न लक्षात ठेवायचे

मध्यस्थ आणि कोचिंग नेटवर्कच्या माध्यमातून हे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले
neet exam paper leak
NEET paper leakfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीचे कारस्थान परीक्षेच्या अनेक महिने आधीच रचले गेले होते. प्रश्नपत्रिका तयार होत असतानाच एनटीएच्या तज्ज्ञांनी त्यातील प्रश्न पाठ केले होते, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणातील आरोपपत्रात केला.

हे आरोपपत्र २८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते आणि त्याबाबतची माहिती शुक्रवारी समोर आली. यानुसार, एनटीएच्या कार्यालयातून हॉटेलवर परतल्यानंतर, हे तज्ज्ञ पाठ केलेले प्रश्न कागदाच्या चिठ्ठ्यांवर लिहून काढत असत. त्यानंतर मध्यस्थ आणि कोचिंग नेटवर्कच्या माध्यमातून हे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात असत. यासाठी व्हॉट्सअँप, टेलिग्रामसारख्या अँपचा वापर केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

neet exam paper leak
Bofors Scam : बोफोर्स प्रकरणावर ४० वर्षांनी अखेर पडदा; सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अपील फेटाळले

सीबीआयने या प्रकरणात १३ आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एनटीए मधील तीन तज्ज्ञांचा समावेश आहे. परीक्षा पेपरची निर्मिती आणि छाननी करताना या तिघांनी पेपरफुटी होण्यास मदत करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. फुटलेला पेपर टेलिग्राम, व्हॉट्सॲप, पीडीएफ फाइल्स आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे पसरवण्यात आला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, नीट पेपरफुटी हे एका व्यक्तीचे काम नव्हते; त्याऐवजी, एनटीएचे तज्ज्ञ, खाजगी कोचिंग सेंटरचे चालक, मध्यस्थ आणि काही विद्यार्थी यांच्या संगनमताने एक संपूर्ण नेटवर्क तयार करण्यात आले होते. तपास यंत्रणेने नमूद केले आहे की, कोचिंग सेंटरचे चालक आणि मध्यस्थांनी परीक्षेच्या अनेक महिने आधीच एनटीएच्या त्या तीन तज्ज्ञांशी संपर्क साधला होता. त्यांच्यात अनेक चर्चा, बैठका आणि आर्थिक व्यवहार झाले, ज्यातून पेपर लीक करण्याचा कट रचला गेला.

neet exam paper leak
Reservation Policy : आरक्षित प्रवर्गांतील उत्पन्नावर आधारित आरक्षणाला केंद्राचा विरोध; सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

प्रश्न लक्षात ठेवणे, चिठ्ठ्या तयार करणे आणि एनसीईआरटी पुस्तकांवर खुणा करणे. मनीषा गुरुनाथ मांढरे, पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा संजय हवालदार हे तज्ज्ञ एनटीएच्या कार्यालयात पेपर तयार करताना प्रश्न लक्षात ठेवत असत. हॉटेलवर परतल्यावर ते ते प्रश्न कागदाच्या चिठ्ठ्यांवर लिहून काढत. लीक केलेले प्रश्न पद्धतशीरपणे पुढे पोहोचवता यावेत यासाठी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधील संबंधित प्रकरणे आणि परिच्छेदांवर खुणा केल्या जात असत.

आरोपपत्रानुसार, एनटीए कार्यालयात प्रवेश करताना किंवा तिथून बाहेर पडताना या तज्ज्ञांची कसलीही झडती घेतली जात नसे. त्यांना कच्च्या कामासाठी कोरे कागद दिले जात असत. कुलकर्णी यांनी या कागदांचा वापर करून रसायनशास्त्राचे १३५ प्रश्न आणि त्यांचे पर्याय लिहून काढले होते. तसेच, त्यांनी रसायनशास्त्राचा पेपर मराठीतून इंग्रजीत अनुवादित करण्याचे कामही केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news