Shivraj Motegaonkar News: शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी, मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात असल्याचा दावा

Shivraj Motegaonkar CBI: रविवारी सीबीआयने आरसीसी या नामांकित कोचिंग सेंटरच्या शिवराज मोटेगावकरला ताब्यात घेतले होते.
shivraj motegaonkar
shivraj motegaonkar Pudhari
Published on
Updated on

Neet Paper Leak 2026 Shivraj Motegaonkar CBI Arrest

नवी दिल्ली : NEET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी अटक झालेल्या शिवराज मोटेगावकरला …. सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. मोटेगावकरने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये फिरवली, असा दावा सीबीआयने कोर्टात केला आहे.

प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 3 मे रोजी देशभर एकाच वेळी घेण्यात आलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट- यूजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आली होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 22.70 लाख विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून या प्रकरणी सीबीआयने देशभरात विविध ठिकाणी कारवाईचा धडाका लावला आहे.

रविवारी सीबीआयने आरसीसी या नामांकित कोचिंग सेंटरच्या शिवराज मोटेगावकरला ताब्यात घेतले होते. सोमवारी त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले.

मोटेगावकरला अटक कधी?

सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपीला नेमकी कधी अटक करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. यावर सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, मोटेगावकर याला रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता पुण्यातून अटक करण्यात आली.

shivraj motegaonkar
Who Is Shivraj Motegaonkar: ट्युशन घेणारा शिक्षक ते 100 कोटींचं कोचिंग साम्राज्य; CBIने अटक केलेला शिवराज मोटेगावकर कोण आहे?

शिवराज मोटेगावकरने प्रश्नपत्रिका फिरवली

शिवराज मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये फिरवली, असा दावा सीबीआयने कोर्टात केला. या प्रकरणात मोठी साखळी कार्यरत असल्याची शक्यता असून संबंधितांच्या आर्थिक व्यवहारांची लिंक तपासणे आवश्यक असल्याचे सीबीआयने सांगितले.

शिवराज कोणाच्या संपर्कात होता?

पेपरफुटीप्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णी हा मोटेगावकर याच्या संपर्कात होता.
कुलकर्णी केमेस्ट्री पेपर सेट करायचा आणि मोटेगावकरचेही केमेस्ट्री क्लास आहेत, याकडेही सीबीआयने कोर्टाचे लक्ष वेधले. मोटेगावकरला 10 दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी तपास यंत्रणांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने शिवराजला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

shivraj motegaonkar
NEET paper case - मुलीसाठी 5 लाखांना खरेदी केला 'नीट'चा पेपर

प्रा. पी. व्ही कुलकर्णी कोण आहे?

प्रल्हाद कुलकर्णी हे पुण्यातील शिक्षणक्षेत्रात पी. व्ही. कुलकर्णी म्हणून परिचित आहे. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. कुलकर्णीने मनीषा वाघमारेच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या निवासस्थानी बोलवून घेतले. या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, अचूक पर्याय सांगण्यात आली होती. मोटेगावकर हा प्रल्हाद कुलकर्णीच्या संपर्कात होता, असे तपासात समोर आले होते. इतकंच नव्हे, प्रल्हाद हा लातूरच्या महाविद्यालयातून निवृत्त झाल्यावर मोटेगावकरच्या कोचिंग सेंटरमध्ये शिकवत होता, असा दावाही केला जातो. प्रल्हाद हा राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका त्याच्यापर्यंत पोहोचू शकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news