नीटची प्रश्नपत्रिका व्हॉटस् अॅपवरून शेअर

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची कबुली; प्राचार्याची चौकशी
NEET Exam
नीटची प्रश्नपत्रिका व्हॉटस् अॅपवरून शेअर Pudhari Photo

रांची : नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने हजारीबाग येथील एका शाळेत प्राचार्याची कसून चौकशी केली आहे. मुकेश आणि चिंटू नामक आरोपींच्या कबुलीजबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. NEET Exam

सीबीआयच्या पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. बिहारसह गुजरातमधील गोध्रा या ठिकाणीही सीबीआयने छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, चिंटू आणि मुकेश या आरोपींना सीबीआय कोठडी देण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पेपरफुटीची व्याप्ती वाढली.

NEET Exam
Talathi Exam : तलाठी परिक्षा असलेल्या काही केंद्रांवर सर्व्हर डाऊन; लाखो परीक्षार्थी खोळंबले

असून, सीबीआयने सहा राज्यांत चौकशीसाठी पथके रवाना केली आहेत. ४ मे रोजी परीक्षेच्या आधी एक दिवस व्हॉटस्अॅपवरून प्रश्नपत्रिका शेअर केल्याचे तपासातून पुढे आले आहे. सीबीआयने बिहारमधील मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना अटक केली. त्याला बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मनीष याने आपल्या वाहनातून विद्यार्थ्यांना आणले होते. आशुतोष याच्या घरी २० ते २५ विद्यार्थ्यांना एकत्र जमवून पेपरफुटीचा सौदा केल्याचे तपासातून पुढे आले आहे.

NEET Exam
राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी, 44 जणांची 4 कोटी 85 लाखांची फसवणूक

युवक काँग्रेसची निदर्शने

नीट पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या युवक संघटनेने निदर्शने करत संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news