NEET Aspirant Died: बारावीच्या टॉपर मुलीनं 'आई - बाबा I Love You म्हणत' उचललं टोकाचं पाऊल.. नीटच्या परीक्षेची करत होती तयारी

NEET Aspirant Died
NEET Aspirant DiedPudhari
Published on
Updated on

NEET Aspirant Died: उत्तराखंड मधील देहरादूनमधील एका २३ वर्षाच्या मुलीनं टोकाच पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. तिने आपल्या आई वडिलांसाठी एक चिठ्ठी देखील सोडली होती. त्यात ती आई वडिलांना आय लव्ह यू म्हणते.

रिया कुमारी थापा असं या मुलीचं नाव असून तीच्या वडिलांनी १९९९ च्या कारगील युद्धात देशसेवा केली होती. रिया ही मंगळवारी सकाळी तिच्या खोलीत मृत आढळून आली होती.

NEET Aspirant Died
Pune Crime: पुण्यात रिअल इस्टेट व्यावसायिकाची आत्महत्या; पत्नी व सावत्र मुलांविरोधात गुन्हा

आई मुलीला जेवणासाठी बोलावायला गेली अन्..

रियाची आई ही आपल्या मुलीला जेवण करायला ये असं सागंण्यासाठी गेली होती. मात्र रिया काही केल्या दार उघडत नव्हती. त्यानंतर आईने रियाच्या वडिलांना बोलवलं. कुटुंबियांनी बळजबरीने दार उघडलं त्यावेळी रियाने गळफास लावून घेतला होता.

तिने रूममध्ये एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. त्यात, 'आई बाबा आय लव्ह यू यात तुमचा काहीही दोष नाही.' असा ह्रदयद्रावक मजकूर लिहिला होता. ही चिठ्ठी तिने हिंदीतून लिहिली होती.

NEET Aspirant Died
UP crime news| भयंकर आणि हृदयद्रावक..! पाषाणहृदयी आईने आवळला चिमुरडीचा गळा; पोटच्या १० वर्षांच्या मुलाने शूट केला व्हिडिओ!

रात्री उशीरापर्यंत करायची अभ्यास

रिया ही रात्री उशीरापर्यंत अभ्यास करत बसायची त्यामुळं ती सकाळी सहसा उशीराच उठायची अशी माहिती तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकित कंदारी यांनी दिली.

कंदारी म्हणतात, 'तिने आपल्या चिठ्ठीत आपल्या कुटुंबीयांबाबत असलेल्या प्रेमाचा उल्लेख करत तुम्ही या घटनेला स्वतःला जबबादार धरू नका असं लिहिलं होतं.

कंदारी यांनी रियाला अभ्यासात मोठं यश मिळत नसल्याने ती निराश होती. तिने टोकाचं पाऊल उचलण्यामागं मुख्यत्वे तिचा अभ्यास आणि त्यातील अपयश हीच प्राथमिक कारणे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

NEET Aspirant Died
Buldhana Crime : आठ वर्षीय मुलाची साक्ष ठरली निर्णायक

रिया थापाही बारावीच्या परीक्षेत आपल्या शाळेत टॉपर होती. तिला ९७ टक्के मार्क पडले होते. ती सध्या नीटच्या री एक्झामची तयारी करत होती. ही परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. तिला पहिल्या प्रयत्नात मेडिकलची प्रवेश परीक्षा क्रॅक करता आलेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news