बनावट नोटा
बनावट नोटा

नक्षलवादी छापताहेत नकली नोटा !

नक्षलवादी छापताहेत नकली नोटा !

जगदलपूर : वृत्तसंस्था : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आता नकली नोटाही छापू लागले असल्याचे उघडकीला आले आहे. शोध मोहिमेअंतर्गत सुकमा पोलिसांनी नक्षल्यांच्या एका ठिकाणावर टाकलेल्या छाप्यातून ही खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

बनावट नोटा
महताब यांनी घेतली लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ

चार हजार ३०० रुपयांच्या नकली नोटा, शाई, प्रिंटर आदी नोटा छापण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. नक्षलवादी संघटनेने आपल्या कॅडर्सना नोटा छापण्याचे प्रशिक्षणही दिल्याचे या कारवाईतून समोर आले.

बनावट नोटा
Lok Sabha Session 2024 Live Updates : लोकसभेचे अधिवेशन सुरू; पंतप्रधान मोदींनी घेतली खासदार म्हणून शपथ

भेज्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मैलासूर, कोराजगुडा, दंतेशपुरम लगतच्या जंगलांतून नक्षल्यांच्या हजेरीची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिस, डीआरजी, बस्तर फायटर्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे मागोवा घेतला. जवान कोराजगुड्याच्या दिशेने निघाले आहेत आणि जवळ पोहोचले आहेत, अशी खबर मिळताच नक्षल्यांनी शस्त्रांसह नोटा छापण्याचे साहित्य जागेवरच सोडून पळ काढला.

बनावट नोटा
मराठमोळ्या प्रसन्ना वराळे यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ

हा ऐवज जप्त

बंदुका, कलर प्रिंटर मशिन, ब्लॅक प्रिंटर मशिन, इन्व्हर्टर, प्रिंटर मशीन कॉटिज, ईमेज किंग, ११८ जीपीएस पावडर, २३ बाटल्या प्रिंटर इंक ५०,१००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटा.

चोख बंदोबस्तामुळे नक्षल्यांची पुरवठा साखळी मोडकळीला आली आहे. पैसाच नसल्याने आता ते नोटा छापत आहेत.

किरण चव्हाण, पोलिस अधीक्षक, सुकमा

logo
Pudhari News
pudhari.news