

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना पदाची शपथ दिली. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत.