

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chhattisgarh Naxalites Encounter | छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कोंडागाव-नारायणपूर सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन कट्टर नक्षलवाद्यांना ठार केले. घटनास्थळी AK-47 रायफलसह दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवाद्याने सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रूपेश मांडवी उर्फ सुखदेव (वय ३४) याने जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. माओवाद्यांची अमानवी विचारसरणी, नक्षलवादी संघटनेतील वाढते मतभेद आणि राज्य सरकारच्या नवीन आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.