पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी केलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे.
सुकमा जिल्ह्यातील सिल्गर आणि टेकुलागुडेम गावांदरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी पेरली होती. सीआरपीएफच्या कोब्रा 201 बटालियनचे कर्मचारी, सिल्गरहून तेकुलागुडेम शिबिरांकडे जात असताना IED स्फोटामुळे एक ट्रक उडाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहे.