PM Modi Garba Song | पंतप्रधान मोदींच्या गरबा गाण्याची सोशल मीडियावर भुरळ

नवरात्रीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडिओ
PM Modi Garba Song
पंतप्रधान मोदींच्या गरबा गाण्याची सोशल मीडियावर भुरळ file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवरात्रीनिमित्त लिहिलेले त्यांचे गरबा गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे गाणे तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर ट्रेड बनत आहे. (PM Modi Garba Song)

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर गरबा गाणे शेअर करताना लिहिले की, "हा नवरात्रीचा पवित्र काळ आहे आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत आहेत, त्यांच्या माँ दुर्गावरील भक्तीने एकत्रित आहेत. भक्ती आणि आनंदाच्या या भावनेत तिच्या सामर्थ्याला आणि कृपेला आदरांजली म्हणून मी गरबा लिहिला आहे, तिचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहोत." (PM Modi Garba Song)

मोदींचा नवरात्रीत उपवास

सोमवारी दुर्गापूजेच्या निमित्ताने लिहिलेले मोदींनी गरबा गाणे सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या गाण्याच्या गायिका पूर्वा मंत्री यांचेही आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी गायकाच्या प्रतिभेचेही कौतुक केले. चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये मोदी ९ दिवस उपवास करतात. यावेळी ते दिवसभरात फक्त लिंबू पाणी पितात आणि रात्री एखादे फळे खातात. (PM Modi Garba Song)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news