महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ८२ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
National Teacher Award
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेशिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदानPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

शालेय, उच्च आणि कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने गुरुवारी (दि.5) सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरचे चित्रकला शिक्षक सागर बागडे, गडचिरोली जिल्ह्यातील मंतैय्या बेडके, पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा.डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्राध्यापक श्रीनिवास होथा तसेच आयटीआय निदेशक विवेक चांदलिया यांचा समावेश आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, ५० हजार रुपये रोख आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

National Teacher Award
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, सुकन्या मुजुमदार यांसह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कारार्थींबद्दलची माहिती

सागर बागडेंविषयी

सागर बागडे गेल्या ३० वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.

मंतैय्या बेडकेंविषयी

मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या ८ वरून १३८ पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.

National Teacher Award
ठाणे - पालघरमधील सहा शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार

विवेक चांदलिया

कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निर्देशक विवेक चिमन चांदलिया यांना हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशकांसाठीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पेंर्टिग आणि स्प्रे चित्रकला या कला क्षेत्रात 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.

प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले यांना उच्च शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन या विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले या गेल्या ३० वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि मानव्य विद्या शाखेच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. प्रा. डॉ. गणपुले यांनी १२ पेक्षा अधिक देशांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांनी ७ पुस्तकांचे लेखन तर १४ पुस्तकांचे संकलन आणि ३ पुस्तकांचे भाषांतर केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १४ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. आणि एम. फिल पूर्ण केले आहे.

National Teacher Award
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

प्रा. श्रीनिवास होथा

प्रा. श्रीनिवास होथा हे कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील नामांकित संशोधक असून त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशात जन्मलेल्या होथा यांनी आंध्र विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी मिळवली आहे. पुढे त्यांनी न्यूयॉर्कच्या रॉकफेलर विद्यापीठात संशोधन केले. भारतात परतल्यानंतर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यांच्या संशोधनात कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news