ठाणे - पालघरमधील सहा शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव
State Teacher Award
ठाणे - पालघरमधील सहा शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार File Photo
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील तीन शिक्षकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा गौरव सोहळा एनसीपीए येथील टाटा सभागृहात झाला.

State Teacher Award
State Teacher Award | रायगडमधील 3 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार

शिक्षक दिनानिमित्त गुरुवारी (दि.5) २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक विभागातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिरवली शाळेतील लक्ष्मण महादेव घागस आणि माध्यमिक विभागातून ठाण्यातील मनोज शालीग्राम महाजन यांची निवड झाली आणि त्यांना गौरविण्यात आले. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक म्हणून प्राथमिक विभागातील शहापूर तालुक्यातील रातांधळे येथील सुधीर पुंडलिक भोईर आणि डहाणू तालुक्यातील रणकोळ मधील रविंद्र मंगीलाल जाधव यांना गौरविण्यात आले. प्राथमिक विभागात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सावते गावाचे शिक्षक शिल्पा बळवंत वनमाळी आणि माध्यमिक विभागातील शिक्षक रामकृष्ण राजाराम पाटील, ( कासा, ता. डहाणू ) यांना गौरविण्यात आले.

State Teacher Award
विद्यार्थी पटसंख्या शंभर.. शिक्षक एक

या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संभाजी थोरात आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news