National Sports Day : राहुल गांधींचे 'जेंटल आर्ट..!

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत
National Sports Day, Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान जिउ-जित्सू करतानाचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.Rahul Gandhi X Account
Published on
Updated on

 पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर भारत जोडो यात्रेदरम्यान जिउ-जित्सू करतानाचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. या माध्‍यमातून त्‍यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्‍याचबरोबर  एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी खेळांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.

Rahul Gandhi : ‘जेंटल आर्ट’च्या सौंदर्याची ओळख करून देणे हे ध्येय

राहुल गांधींनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास केला. या काळात आमच्या शिबिराच्या ठिकाणी दररोज संध्याकाळी जिउ-जित्सूचा सराव करण्याचा आमचा नित्यक्रम होता. तंदुरुस्त राहण्याचा एक सोपा मार्ग म्हणून आम्‍ही हा उपक्रम सुरु केला. आम्ही राहिलो त्या शहरांतील सहयात्री आणि तरुण मार्शल आर्ट विद्यार्थ्यांना एकत्र आणले. या तरुण मनांना ध्यान, जिउ-जित्सू, आयकिडो आणि अहिंसक संघर्ष निराकरण तंत्रांचे सुसंवादी मिश्रण ‘जेंटल आर्ट’च्या सौंदर्याची ओळख करून देणे हे आमचे ध्येय होते.

खेळ तुम्हाला शारीरिक मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो

शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये राहुल गांधी मुलांना मार्शल आर्टचा वापर स्‍वसंरक्षणाबरोबरच आपल्‍या शरीरातील उर्जेचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देताना दिसताना. तुम्ही कोणताही खेळ खेळलात तरी तो तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो, असे स्‍पष्‍ट करत जिउ-जित्सू  मार्शल आर्टच्या माध्यमातून मुलांना एकाग्रता, अहिंसा, स्वसंरक्षण आणि त्यांच्यातील आंतरिक शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही ते सांगताना दिसतात. राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शेअर केला या व्‍हिडिओमुळे काहींना ‘जेंटल आर्ट’चा सराव करण्यास प्रेरणा मिळेल, अशी आशाही राहुल गांधी व्‍यक्‍त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news