Narendra Modi gifts e-auction : PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव... भवानी मातेच्या मूर्तीची मूळ किंमत आहे किती?

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1,300 भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू
Narendra Modi gifts e-auction
नवी दिल्ली ः केंद्रीय संस्कृतिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी बुधवारी ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे ई-लिलावाची घोषणा केली.pudhari photo
Published on
Updated on

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या 1,300 हून अधिक वस्तूंचा बुधवारपासून ई-लिलाव सुरू करण्यात आला असून, या भेटवस्तूंमधील देवी भवानीमातेच्या मूर्तीची मूळ किंमत 1 कोटी 3 लाख 95 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

केंद्रीय संस्कृतिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी येथील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे पत्रकार परिषदेत ई-लिलावाची घोषणा केली. यातील वस्तू खरेदी करण्यासाठी देशभरातील सर्व नागरिकांना बोली लावता येणार आहे.

या भेटवस्तूंमध्ये देवी भवानीची मूर्ती, अयोध्येतील राम मंदिराचे कोरलेले मॉडेल आणि पॅरालिम्पिक खेळ 2024 च्या क्रीडा स्मृतिचिन्हांचा संच आदींचा समावेश आहे. राम मंदिराच्या मॉडेलची मूळ किंमत 5.5 लाख रुपये आहे. याशिवाय, पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे तीन जोडी बूटदेखील आहेत. त्यांची मूळ किंमत 7.7 लाख रुपये आहे.

याखेरीज अन्य भेटवस्तूंमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पश्मीना शाल, राम दरबाराचे तंजावरचे चित्र, धातूची नटराजाची मूर्ती, जीवनवृक्षाचे चित्रण करणारी गुजरातमधील रोगन कलाकृती, हाताने विणलेली नागा शाल यांचा समावेश आहे. ई-लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल. यातून मिळणारे उत्पन्न दरवर्षीप्रमाणे ‘नमामि गंगे मिशन’ला दान केले जाईल.

Narendra Modi gifts e-auction
Rahul Gandhi Press Briefing : राहुल गांधींची पत्रकार परिषद; hydrogen bomb टाकणार?

आपल्याला मिळालेल्या भेटवस्तू उदात्त कार्यासाठी समर्पित केलेले मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे संस्कृती मंत्रालयाने म्हटले आहे. यावर्षी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावाची सातवी आवृत्ती आहे. पहिला लिलाव जानेवारी 2019 मध्ये झाला होता. आतापर्यंत लिलावातून 50 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली.

गेल्या सात वर्षांत, 2024 मध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी 600 वस्तूंचा लिलाव करण्यात आला. गेल्यावर्षी, ई-लिलावात सर्वात महागडी वस्तू निषाद कुमारची होती. त्याने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते व त्याची किंमत 10 लाख रुपये होती.

पहिल्या लिलावात 1,805 वस्तू

यापूर्वी, 2019 मध्ये पहिल्या लिलावात 1,805 वस्तू, 2020 मध्ये दुसर्‍या लिलावात 2,772 वस्तू, 2021 च्या तिसर्‍या लिलावात 1,348 वस्तू, 2022 च्या चौथ्या लिलावात 1,200 वस्तू आणि पाचव्या लिलावात 912 दुर्मीळ वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news