MyGov Helpdesk : आता व्हॉट्सअॅपवर काढता येणार पॅनकार्ड आणि ड्राईव्हिंग लायसन्स

 Helpdesk
Helpdesk

नागरिकांना पॅनकार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, १०-१२ वीच्या निकालाची प्रत यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे सहजरित्या मिळणार आहेत. ही कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करणार असल्याची घोषणा माय गव्हर्नमेंट हेल्पडेस्कने केली आहे. (MyGov Helpdesk)

देशभरातील व्हॉट्सअॅप युजर्स +91 9013151515 या क्रमांकावर मेसेज पाठवून आपण या प्रक्रियेला सुरूवात करू शकता. नागरीकांना आवश्यक असणारी कागदपत्रे सहजरित्या काढता येण्यासाठी ही डिजीलॉकर सेवा सुरू करण्यात येत आहे. डिजीलॉकरवर जवळपास 100 दशलक्ष लोकांनी आधीच नोंदणी केली आहे. (MyGov Helpdesk)

आम्हाला खात्री आहे की, व्हॉट्सअॅपवरील सेवा लाखो लोकांना त्यांच्या फोनमधूनच कागदपत्रे आणि माहिती मिळविण्यात मदत करून डिजिटल रूपाने सक्षम करेल, असे माय गव्हर्नमेंटचे सीईओ अभिषेक सिंग म्हणाले आहेत. आतापर्यंत ८० दसलक्षाहून अधिक लोकांनी हेल्पडेस्कचा वापर केला आहे. तर ३३ दशलक्षाहून अधिक लोकांनी अनेक कागदपत्रेही डाऊनलोड केले आहेत. (MyGov Helpdesk)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news