Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळूरदरम्यान धावणार देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’

प्रवासाचा वेळ ८ तासांनी कमी होणार!
Vande Bharat Sleeper Train
Vande Bharat Sleeper Trainpudhari photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय रेल्वे लवकरच देशातील दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. गुवाहाटी-हावडा मार्गावरील पहिल्या स्लीपर ट्रेनच्या यशानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आयटी हब बंगळुरू या दोन महानगरांदरम्यान ही अतिवेगवान सेवा सुरू होत आहे. या महिन्याच्या अखेरीस या गाडीला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या तीन दशकांपासून प्रवासी मुंबई-बंगळुरू दरम्यान वेगवान रेल्वे सेवेची मागणी करत होते. सध्या धावणाऱ्या 'उद्यान एक्सप्रेस'ला या प्रवासासाठी सुमारे २४ तास लागतात. मात्र, ही नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन हे अंतर १६ तासांपेक्षा कमी वेळेत पार करेल.

Vande Bharat Sleeper Train
Windmill Project : पवनचक्की प्रकल्पाविरोधात ईटमध्ये बाजारपेठ बंद

आठवड्यातून ६ दिवस धावणाऱ्या या गाडीमुळे प्रवाशांचे तब्बल ८ तास वाचतील. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ही गाडी बंगळुरूहून रात्री १० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० वाजता मुंबईत पोहोचेल; तर मुंबईहून रात्री १०:३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० वाजता बंगळुरूत दाखल होईल. या प्रवासात गाडीला कल्याण, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुंतकल आणि अनंतपूर या स्थानकांवर थांबे असतील.

आधुनिक सुविधा आणि युरोपियन डिझाईनची वैशिष्ट्ये

१६ डब्यांच्या या गाडीत ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश असेल. ही गाडी ताशी १६० किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे.

  1. आरामदायी प्रवास : युरोपियन धाटणीचे कुशन बर्थ, वरच्या बर्थवर चढण्यासाठी सुलभ पायऱ्या आणि उत्तम वातानुकूलनासाठी सीलबंद गँगवे.

  2. विमानासारखी सुविधा : बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, फर्स्ट एसी प्रवाशांसाठी गरम पाण्याच्या शॉवरची सोय आणि स्वतंत्र बेबी केअर स्टेशन.

  3. सुरक्षा व्यवस्था : अपघात रोखण्यासाठी स्वदेशी बनावटीची 'कवच' यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम आणि इमर्जन्सी टॉक-बॅक युनिट.

Vande Bharat Sleeper Train
Tukaram Mundhe : न्यूयाॅर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news