Tukaram Mundhe : न्यूयाॅर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढे

‘इन इंडिया फूड सेफ्‍टी इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ असा मथळा देत अमेरिकेचे अग्रगण्य दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने त्‍यांची पहिल्या पानावर विशेष वृत्त देऊन खास दखल घेतली.
Tukaram Mundhe New York Times
मुंबई : न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारांनी एफडीएच्या काही धाडी याची देही याची डोळा पाहिल्या. तिथली झुरळे बघितली, किचनची घाण पाहिली आणि टाळे ठोकतानाचा अनुभवही घेतला. pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : आपल्या धडाकेबाज कारवायांनी भेसळसम्राटांमध्ये जरब बसवणारे आणि महाराष्ट्राच्या हॉटेलांमधील जेवणशैली शुद्ध आणि भेसळमुक्त करणारे डॅशिंग अधिकारी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर झळकले आहेत.

‘इन इंडिया फूड सेफ्‍टी इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ असा मथळा देत अमेरिकेचे अग्रगण्य दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने त्‍यांची पहिल्या पानावर विशेष वृत्त देऊन खास दखल घेतली. या बातमीची सुरुवात तुकाराम मुंढे यांच्या पथकाने मुंबईत ऑलिम्पिया या प्रसिद्ध रेस्टॉरंटवर टाकलेल्या धाडीने होते. या पथकाने ऑलिम्पियाच्या स्वयंपाक घराची कसून तपासणी केली. तेथे असलेल्या तंदूरभट्टयांपासून ते लोण्याच्या साठयावरील वापराची अंतिम मुदत तपासली.

Tukaram Mundhe New York Times
Ahilyanagar Zilha Parishad Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन; ९.५० कोटींचा निधी जमा होणार

अधिकाऱ्यांना अनेक त्रुटी आढळल्या. एक कर्मचारी जमिनीवर बसून आले चिरत होता, दुसरा पोळया लाटत असताना शॉर्टस घालून बसला होता. तेथे असलेल्या तेलाच्या डब्याजवळ झुरळे फिरत होती. याशिवाय अनेक गंभीर नियमभंग आढळले आणि १०० वर्षांहून जुन्या असलेल्या या रेस्टॉरंटला एफडीएने टाळे ठोकले.

विशेष म्हणजे ऑलिंपिया येथे काही महिन्यांपूर्वी द ओडीसी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेले मॅट डेमन आणि टॉम हाॅलंड यांनी चहा घेतला होता, याकडे न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त वाचकांचे लक्ष वेधते.

अशा अनेक कारवाया एफडीएने केल्या. रस्त्‍यांवरील खाद्यविक्रेते, सरकारी कॅन्टीन, उच्चभ्रू रेस्टॉरंटस तसेच मॅकडोनाल्डसारख्या साखळी रेस्टॉरंटची तपासणी देखील तुकाराम मुंढेच्या नेतृत्‍वाखाली होत आहे, अशी नोंद न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या गौरवपूर्ण वृत्तात केली आहे.

टाइम्स म्हणते, तुकाराम मुंढे यांच्या या मोहिमांनी देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे काम अनेकांना केवळ चमत्कार वाटते. त्यांच्या कारवायांचे जितके कौतुक तितकीच दहशतदेखील जाणवते. अनेकांना त्यांच्यात साक्षात देवही दिसला आणि अलीकडेच धुमधडाक्यात साजरा झालेल्या गणेशोत्सवातील एका देखाव्‍यात तर चक्क तुकाराम मुंढेही विराजमान झाले. आधुनिक संत म्हणून गणले गेले. ते छायाचित्रही न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

Tukaram Mundhe New York Times
Rashi Bhavishya Today: आज धाडसी निर्णय घ्यावा लागणार, मेहनतीचे अपेक्षित फळही मिळणार; पाहा काय सांगते तुमची रास?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news