भारतात आढळला मंकीपॉक्स संशयित रुग्ण, सरकारकडून खबरदारीचा उपाय

monkey-pox In India |संशयित तरूणाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवले
monkeypox
मंकीपॉक्सPudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: नुकताच परदेशातून भारतात परतलेल्या एका तरुणाला मंकीपॉक्सचा (Mpox) संसर्ग झाल्याचा संशय आहे. सरकारने योग्य खबरदारी घेत त्याला आज (दि.८ ) रुग्णालयात दाखल केले आहे. संबधित संशयित तरुणाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे

संशयित तरूणाची प्रकृती सध्या स्थिर असून, मंकीपॉक्स (Mpox) विषाणूच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जात असल्‍याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने 'ANI'ने दिले आहे.

संशयित संबंधित तरुणाचे ट्रेसिंग सुरू

हे प्रकरण प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार व्यवस्थापित केले जात आहे. देशातील प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी संपर्क ट्रेसिंग चालू आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

आतापर्यंत ९९,१७६ मंकीपॉक्सची प्रकरणे आढळली

जागतिक आरोग्य संघटनानुसार (WHO) १ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२४ या कालावधीत जगभरात मंकीपॉक्सची (Mpox) एकूण ९९,१७६ प्रयोगशाळा-पुष्टी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जून २०२४ मध्ये एकूण ९३४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील पाच सदस्य देशांपैकी, थायलंडमध्ये ८०५ पुष्टी प्रकरणे आणि 10 जणांचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला. त्यानंतर इंडोनेशियामध्ये ८८ पुष्टी प्रकरणे, भारतात २७ पुष्टी प्रकरणे आणि १ मृत्यू तर श्रीलंकांध्ये ४ आणि नेपाळमध्ये १ मृत्यू झाला आहे.

मंकीपॉक्सची ही लक्षणे आहेत

  1. मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि सुज लेल्या लिम्फ नोड्स यांचा समावेश होतो. यानंतर पुरळ उठतात. पुरळ उठायला चेहऱ्यापासून सुरू होतात आणि संपूर्ण शरीरात उठतात. डागांपासून मुरुमांपर्यंत पुरळ विकसित होते, जे शेवटी खरुज बनतात. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे राहतात.

  2. मंकीपॉक्सबाबत कोणतेही प्रकरण देशात आया आले नाही. याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना केंद्र सरकाराकडून लागू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी केले.

  3. हा आजार संसर्गजन्य असून पूर्वीच्या देवी अजारासारखा आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त इतर देशांत रुग्ण नसले तरी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांकडून हा आजार पसरण्याची भीती आहे. हा आजार खोकल्यातूनही पसरू शकतो. तसेच लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले

monkey-pox: काय काळजी घ्यावी?

  • बाधित व्यक्तीचे विलगीकरण करावे

  • बाधित व्यक्तीला मास्कने नाक आणि तोंड झाकायला सांगावे

  • रुग्णाची माहिती आरोग्य केंद्रात द्यावी

  • रुग्णाने वापरलेल्या वस्तूंचा वापर टाळावा

  • साबण, पाणी वापरून हात स्वच्छ ठेवावेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news