

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील मंदुसर जिल्ह्यातील एक राजकारणी कारमध्येच व एक्सप्रेसवर एका महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली आहे. दिल्ली मुंबई हायवेवर हे सुरु होते. हे फूटेज आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई सुरु केली आहे.
ही घटना १३ मे रोजी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर घडली या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा एक्सप्रेसवे आठ लेनचा हाय-सिक्युरिटी कॉरिडॉर असून तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. मध्यप्रदेशातील जिल्हापातळीवरील राजकारणी असलेले हे मनोहरलाल धाकड हे एका महिलेसोबत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना स्पष्टपणे दिसत आहेत.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की या व्हीडीओत दिसणारी पांढऱ्या रंगाची कार ही मनोहरलाल धाकड यांच्या नावावर आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी धाकड आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.
घटनेनंतरपासून धाकड हे फरार असून त्यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरू केली आहे आणि संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू आहे. धाकड याची पत्नी सोहनबाई या मंदसरु जिल्ह्यातील बानी गावच्या सरपंच आहेत.