Taj Mahal : पत्नीच्या प्रेमासाठी व्यावसायिकाने बांधलं ताजमहालसारखं घर; पाहा Video
मध्यप्रदेश : प्रेमासाठी कोण काय करील सांगता येत नाही. मुघल सम्राट शाहजहानने पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला होता. आजही ताजमहालला प्रेमाचं प्रतीक मानतात. मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील एका व्यावसायीकानेही आपल्या पत्नीसाठी ताजमहालासारखे घर बांधले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कसं उभारलं ताजमहलसारखं घर?
बुरहानपूर येथे राहणारे व्यावसायिक आनंद प्रकाश चौकसे आणि त्यांची पत्नी अंजली यांनी हे घर बांधले आहे. संगमरवरी बनवलेले हे 4BHK घर ताजमहालाची एक छोटी प्रतिकृती म्हणून बांधले गेले आहे. या जोडप्याने सांगितलं की त्यांनी घर उभारण्यासाठी मकराना संगमरवर वापरला आहे आणि मूळ ताजमहलमध्ये वापरलेल्या मापांना फूटमध्ये रूपांतरित केलं आहे. हे घर खऱ्या ताजमहलच्या तुलनेत सुमारे तीनपट लहान आहे. आजूबाजूला सुंदर कोरीवकाम, गोल घुमट आणि कमानीदार दरवाजे हे खूप आकर्षक बनवले आहेत. हे घर आनंद चौकसे यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये बांधले आहे. इंस्टाग्राम आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका वापरकर्त्याने पोस्ट केला आहे.
१६३१ मध्ये बांधला मूळ ताजमहाल
मूळ ताजमहाल हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथे यमुना नदीच्या उजव्या तीरावर एक हस्तिदंती-पांढऱ्या संगमरवरी मकबरा आहे. १६३१ मध्ये पाचव्या मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलची कबर ठेवण्यासाठी तो उभारला. त्यात शाहजहानची कबर देखील आहे.
