“माझ्‍या स्‍वप्‍नात आई आली..” : जन्‍मदात्‍या आईने चिमुकल्‍याचा गळा चिरला, नंतर जिंवत जाळले!

“माझ्‍या स्‍वप्‍नात आई आली..” : जन्‍मदात्‍या आईने चिमुकल्‍याचा गळा चिरला, नंतर जिंवत जाळले!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जन्‍मदात्‍या आईने आपल्‍या चार वर्षाच्‍या एकुलत्‍या एक मुलाचा फावड्याने गळा चिराला, त्‍याचा मृत्‍यू झाला नाही म्‍हणून त्‍याला गॅसच्‍या शेगडीवर जाळले. तरीही त्‍याचा मृत्‍यू झाला नाही म्‍हणून त्‍याला लाकडे पेटवून जिवंत जाळले. ही भयंकर घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्‍ये घडली आहे. पोलीस चौकशीत महिलेने गुन्‍ह्याची कबुली दिली आहे. "माझ्‍या स्‍वप्‍नात माझी आई आली. तिने माझ्‍याकडे मुलाचे गिफ्ट मागितले. मी ते दिले." महिलेच्‍या या कबुली जबाबाने ग्रामस्थ चक्रावून गेले आहेत. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी या घटनेची माहिती घेतल्यानंतर ही महिला मनोविकाराने ग्रस्त असावी, असा संशय व्यक्त केला आहे.

बिजनौरमधील जलालपूर हसना गावातील रहिवासी कपिल कुमार यांचा विवाह मोहलारपूर गावात राहणाऱ्या आदेश देवीसोबत पाच वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर साधारण वर्षभरात मुलगा झाला.

आईने कौर्याची परिसीमा गाठली… वडिलामुळे गुन्‍हा आला उघडकीस

सकाळी पती शेतात गेल्‍यानंतर आदेशदेवीने आपल्या चार वर्षाच्या मुलगा हर्ष याचा कुदळीने गळा चिरला. यानंतर त्याला गॅसच्या शेगडीवर ठेवून जाळण्याचा प्रयत्न केला. मूल जिवंत राहिल्‍याने लाकडाचा ढीग करुन मुलाला जिंवत जाळले. याचवेळी महिलेचा पती घरी आला. त्‍याने मुलाला आगीतून बाहेर काढले. तो जिंवत होता. त्‍याने आगीत होरपळलेल्‍या मुलाला घेवून रुग्‍णालयात धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच मुलाचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

"आई माझ्‍या स्‍वप्‍नात आली…."

पतीने या प्रकरणी बिजनौरच्या हीमपूर दीपा पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. चौकशीत महिलेने सांगितले की, तिची आई तिला स्वप्नात आली होती. तिने तिच्या मुलाचे गिफ्ट मागितले. तिने ते दिले. या घटनेने ग्रामस्थही चक्रावून गेले आहेत. प्रत्येकजण म्हणत होता की आई असं कसं करू शकते? त्याचवेळी, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी या घटनेची माहिती घेतल्यानंतर ही महिला मनोविकाराने ग्रस्त असावी, असा संशय व्यक्त केला आहे.महिला मानसिक रुग्ण होती, तिच्यावर उपचार सुरू होते, असे तिच्‍या भावाने सांगितले. मात्र दीड वर्षापासून तिची औषधे बंद होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news