Monsoon 2025 India | मान्सूनची आगेकूच; असा असेल यंदाचा भारतातील पावसाचा प्रवास

IMD monsoon forecast | गेल्या चोवीस तासांत किनारपट्टी कर्नाटक, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. जाणून घ्या यापुढे मान्सूनचा प्रवास कसा असेल?
Monsoon 2025 India
Monsoon 2025 Indiafile photo
Published on
Updated on

Monsoon 2025 India IMD forecast

नवी दिल्ली : पावसाने देशाच्या विविध भागांमध्ये जोरदार प्रगती केली असून, येत्या २५ जूनपर्यंत तो वायव्य भारताचा बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

गेल्या चोवीस तासांत किनारपट्टी कर्नाटक, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कर्नाटकातील कारवार येथे सर्वाधिक २४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची सध्याची प्रगती समाधानकारक असून, तो वेळेवर वायव्य भारताच्या दिशेने सरकत आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

Monsoon 2025 India
Maharashtra Irrigation Projects |राज्यातील 30 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: मुख्यमंत्री

गेल्या २४ तासांतील पावसाची आकडेवारी

(१२ जून २०२५ सकाळी ८.३० ते १३ जून २०२५ सकाळी ८.३० पर्यंत, मिमीमध्ये)

  • किनारपट्टी कर्नाटक : कारवारमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली, २४२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल होनावर येथे १२१ मिमी आणि मंगळूर (बाजपे) येथे ७२ मिमी पावसाची नोंद झाली.

  • कोकण आणि गोवा: गोव्याची राजधानी पणजी येथे ९१ मिमी पाऊस झाला. मुरगाव येथे ५७ मिमी, तर रत्नागिरीत ४१ मिमी पाऊस कोसळला आहे.

  • मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर होता, येथे ६९ मिमी पावसाची नोंद झाली.

  • केरळ आणि माहे : कोचीन विमानतळ परिसरात ४१ मिमी पाऊस झाला.

  • मिझोराम : ईशान्येकडील मिझोराममधील लेंगपुई येथे ४७ मिमी पावसाची नोंद झाली.

  • अंदमान आणि निकोबार बेटे : श्री विजया पुरम येथे ५७ मिमी आणि हट बे येथे ४० मिमी पाऊस झाला.

  • लक्षद्वीप : मिनिकॉय बेटावर ५७ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news