

Monsoon 2026: Southwest Monsoon Arrives in Kerala; IMD Announces
पुढारी ऑनलाईन : केरळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी तीन तासांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी (4 जून 2026) नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा केली. यंदा मान्सूनचे आगमन नेहमीच्या 1 जूनच्या तारखेपेक्षा तीन दिवस उशिरा झाले असून, IMD ने वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही चार दिवस उशिराने ते दाखल झाले आहे.
बुधवार रात्रीपासून केरळच्या विविध भागांत जोरदार पाऊस सुरू असून, परिस्थिती लक्षात घेऊन IMD ने गुरुवारी अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला.
यापूर्वी IMD ने मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मान्सूनच्या आगमनास विलंब झाला. त्यानंतर 29 मे रोजी विभागाने पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती.
IMD च्या माहितीनुसार, यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या (Long Period Average - LPA) सुमारे 90 टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी किमान तापमान 29.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाने दिल्लीसाठी पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वातावरणाचा यलो अलर्ट जारी केला आहे.