Mohan Bhagwat : 'RSSची नोंदणी ब्रिटिश सरकारकडे करणे अपेक्षित होते का?' : सरसंघचालकांचा काँग्रेसला सवाल

आरएसएसला व्यक्तींची संघटना म्हणून मान्यता असल्‍याचेही दिले टीकाकारांना प्रत्‍युत्तर
Mohan Bhagwat
Mohan BhagwatPudhari File Photo
Published on
Updated on

Mohan Bhagwat on RSS registration : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्‍ही ब्रिटिश सरकारकडे संघटनेची नोंदणी करावी, अशी अपेक्षा करता का?" असा सवाल करत "आम्हाला व्यक्तींची संघटना म्हणून वर्गीकृत केले आहे आणि आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत," असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने (आरएसएस) आयोजित केलेल्या अंतर्गत प्रश्नोत्तर सत्रात एका प्रश्नाचे उत्तर देताना स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान,काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अलीकडेच आरएसएसवर बंदी घालायला हवी असे म्हटले होते. तसेच यानंतर खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सरकारी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी आरएसएसचा नोंदणी क्रमांक आणि त्यांच्या निधीच्या स्रोतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता सरसंघचालकांनी प्रत्‍युत्तर दिले आहे.

आम्‍ही नसतो तर कोणावर बंदी घालती असती

यावेळी मोहन भागवत म्‍हणाले की, आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली. ब्रिटिश सरकारच्‍या काळात संघटनाची नोंद होतच नव्‍हती. तसेच स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने नोंदणी अनिवार्य केली नाही. आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएसला व्यक्तींची संघटना म्हणून संबोधले आहे. संघटनेला आयकरातून सूट देण्यात आली आहे."आमच्यावर तीनदा बंदी घालण्यात आली. म्हणून सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे. जर आम्ही तिथे नसतो तर त्यांनी कोणावर बंदी घातली?" असा सवालही सरसंघचालकांनी केला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नोंदणीकृत नाहीत. "हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही," असेही ते म्‍हणाले.

Mohan Bhagwat
Pune Land Scam : इतकी फास्ट कारवाई का? पार्थ पवार जमीन प्रकरणी रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

संघाला तिरंग्‍याचा खूप आदर

संघात भगव्याला गुरु मानले जात असले तरी, भारतीय तिरंग्याचा खूप आदर आहे. "आम्ही नेहमीच आमच्या तिरंग्याचा आदर करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे रक्षण करतो," असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.https://www.youtube.com/watch?v=TnEwGHy7cNk

Mohan Bhagwat
Rahul Gandhi : 'मुख्य मुद्दा 'मतचोरी', आणखी पुरावे लवकर जाहीर करणार'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news