

भारत केवळ देश नाही अद्वितीय संस्कृती
भाजपच्या दृष्टिकोनातून आरएसएसला समजून घेणे चूक
भारताला पुन्हा जगाचे नेतृत्त्व बनवणे हेच आरएसएसचे ध्ये
RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh violence
कोलकाता : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत आणि तेथील परिस्थिती खूप कठीण आहे. म्हणून तेथील हिंदूंनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एकजूट राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केले. ते पश्चिम बंगालमधील सायन्स सिटी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगभरा विशेषतः बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली.
मोहन भागवत म्हणाले की, "केवळ बांगलादेशातीलच नाही तर जगभरातील हिंदूंनी त्यांना मदत करावी. आपण आपल्या सीमेत शक्य तितकी मदत करावी आणि आम्ही ते करत आहोत. भारत हा हिंदूंसाठी एकमेव देश आहे, म्हणून भारत सरकारने या मुद्द्यावर लक्ष दिले पाहिजे."
तुम्ही आरएसएसला फक्त एक सेवा संस्था मानत असाल तर तुम्ही चुकीचे ठराल. बरेच लोक भाजपच्या दृष्टिकोनातून आरएसएसला समजून घेण्याचा कल ठेवतात, जी एक गंभीर चूक आहे. आरएसएसच्या स्थापनेचे सार एका वाक्यात आहे: "भारत माता की जय." भारत हा केवळ एक देश नाही, तर त्याच्या अद्वितीय संस्कृती, परंपरा आणि निसर्गाचे नाव आहे. आरएसएसचे ध्येय हे आहे की, समाजाला या मूल्यांचे समर्थन करून भारताला पुन्हा जगाचे नेतृत्त्व बनवण्यासाठी तयार करणे असल्याचेही भागवत यांनी यावेळी सांगितले.
भूतकाळात आपण ब्रिटिशांविरुद्धचे युद्ध हरलो, परंतु आता आपल्या समाजाला संघटित आणि सक्षम करण्याची वेळ आली आहे. त्यांचे संपूर्ण भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर, "व्यक्तिगत विकासाद्वारे राष्ट्रनिर्माण" या तत्त्वज्ञानावर आणि एकसंध हिंदू समाजासह समृद्ध भारताच्या ध्येयावर केंद्रित होते, असेही भागवत म्हणाले.