Crime News: "पुन्हा पॅचअप कर" नकार दिला म्हणून ऑफिसमध्ये तरूणीवर चाकूने सपासप वार, स्वतःचाही गळा कापला; CCTV व्हिडिओ समोर

प्रेमप्रकरणातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर तिच्याच माजी प्रियकराने चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.
ex girlfriend killed in mohali office
ex girlfriend killed in mohali officefile photo
Published on
Updated on

Crime News Ex girlfriend killed in mohali office

मोहाली: पंजाबमधील मोहालीत प्रेमप्रकरणातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. एका खासगी कंपनीत डेस्कवर काम करणाऱ्या तरुणीवर तिच्याच माजी प्रियकराने चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.

कार्यालयातील इतर सहकाऱ्यांनी तरुणीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र माथेफिरू तरुणाने तिच्यावर वार करणे सुरूच ठेवले. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःचाही गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून परिसरात तीव्र खळबळजनक उडाली आहे.

ex girlfriend killed in mohali office
Dhule crime news: आधी अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला, मग भेटायला बोलावलं आणि...; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

कार्यालयातच गाठले आणि...

डिंपल (रा. पतियाळा) असे मृत तरुणीचे नाव असून, ती मोहालीतील एका नामांकित पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीत काम करत होती. घटनेच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करत असताना, तिचा जुना सहकारी आणि माजी प्रियकर हरविंदर सिंग ऊर्फ हॅरी तिथे आला. काही समजण्याच्या आतच हॅरीने डिंपलवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. सुरुवातीच्या वारानंतर डिंपलने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, हॅरीने तिला दरवाजाजवळ गाठले आणि पुन्हा तिच्यावर सपासप वार केले.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीच्या डोक्यावर सुडाचे भूत स्वार असल्याने तो कोणालाही जुमानला नाही. डिंपल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हॅरीने स्वतःच्या गळ्यावरही चाकू फिरवला.

रुग्णालयात तरुणीचा मृत्यू, आरोपीची प्रकृती चिंताजनक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही गंभीर अवस्थेत फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डिंपलचा मृत्यू झाला. दुसरीकडे, आरोपी हरविंदर मान ऊर्फ हॅरी याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

तीन वर्षांची मैत्री आणि विरहाचा सुड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपल आणि हॅरी गेल्या तीन वर्षांपासून एकाच कंपनीत एकत्र काम करत होते. या काळात त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने डिंपलने हॅरीसोबतचे नाते तोडले होते.

मानसिक नैराश्यातून टोकाचे पाऊल

ब्रेकअपनंतर हॅरी प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्याने डिंपलसोबत पुन्हा नाते जोडण्याचे आणि संवाद साधण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, डिंपलने त्याला नकार दिला. याच नकाराचा राग मनात धरून हॅरीने सूडबुद्धीने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे.

ex girlfriend killed in mohali office
Sambhajinagar Crime News : मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news