PM Ujjwala Yojana| मोदी सरकारची मोठी घोषणा! नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मिळणार 25 लाख उज्ज्वला गॅस सिलेंडर

PM Ujjwala Yojana|नवरात्रीच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
PM Ujjwala Yojana
PM Ujjwala Yojana
Published on
Updated on

नवरात्रीच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने' अंतर्गत आणखी २५ लाख गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाकडी चुलीमुळे होणाऱ्या धुरापासून महिलांच्या आरोग्याला होणारा धोका कमी करणे आणि त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

PM Ujjwala Yojana
High Court on Adultery : व्यभिचार आता गुन्हा नाही; पण माफीही नाही; जोडीदार प्रियकरावर भरपाईसाठी दावा दाखल करू शकतो : हायकोर्ट

६७६ कोटी रुपयांचा खर्च

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (PM Ujjwala Yojana) एक मोठा टप्पा गाठला आहे. गेल्या नऊ वर्षांत या योजनेअंतर्गत देशभरातील १०.५८ कोटी कुटुंबांना एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नुकतीच ही माहिती दिली असून, या यशामुळे महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. या योजनेंतर्गत नुकतेच आणखी २५ लाख नवीन लाभार्थ्यांना जोडण्यात आले आहे. यासाठी ६७६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

काय आहे 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना'?

2016 मध्ये भारत सरकारने ही योजना सुरू केली होती. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांमधील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. योजनेअंतर्गत, सरकार मोफत एलपीजी सिलेंडर, एक भरलेला गॅस सिलेंडर आणि शेगडी (hotplate) देतं. या योजनेचा उद्देश केवळ गॅस कनेक्शन देणे नाही, तर महिलांचे जीवनमान उंचावणे हा आहे.

PM Ujjwala Yojana
Amit Shah : ज्यावेळी इतिहास पंतप्रधानांची तुलना करेल त्यावेळी.... अमित शहा PM मोदींबद्दल काय म्हणाले?

महिला सशक्तीकरणासाठी 'गेम चेंजर'

उज्ज्वला योजना महिला सशक्तीकरणासाठी एक 'गेम चेंजर' ठरली आहे. पारंपरिक लाकडी चुलीमुळे होणाऱ्या धुराच्या त्रासातून या योजनेने महिलांची सुटका केली आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याला होणारे धोके कमी झाले आहेत. धुरामुळे श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार होण्याचा धोका कमी झाला आहे.

याव्यतिरिक्त, गॅसवर स्वयंपाक केल्यामुळे महिलांचा वेळ वाचतो. हा वाचलेला वेळ त्या इतर सामाजिक आणि आर्थिक कामांसाठी वापरू शकतात. त्यामुळे, उज्ज्वला योजना केवळ एक इंधन योजना नसून, एक सामाजिक क्रांती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news