

Amit Shah Comment On PM Modi Era :
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीटीव्हीचे संपादक राहुल कनवल यांना दिलेल्या मुलाखतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनेक विधान केलं आहेत. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हा इतर पंतप्रधानांच्या तुलनेत उजवा असेल असं वक्तव्य केलं. त्यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्याशी देखील केली. त्यात देखील मोदीचं उजवे आहेत असा दावा शहा यांनी केला.
अमित शहा म्हणाले, 'ज्यावेळी इतिहास हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा आणि इतर पंतप्रधानांच्या कार्यकाळाची तुलना करेल त्यावेळी त्याचं उत्तर हे नरेंद्र मोदींच्या बाजूनं आलेलं असेल.
पंतप्रधान नेहरू यांनी सर्वाधिक काळ देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. त्यांनी १६ वर्षे देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. ते सर्वाधिक काळ देशाचं सलग पंतप्रधानपद भूषवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ते गुजरातचे सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्री देखील राहिले आहेत.
दरम्यान, अमित शहा यांनी मुलाखतीत सांगितलं की, 'नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २५ कोटी लोकं गरिबी रेषेच्या वर आली आहेत. देशाची अर्थव्यवस्था ही ११ व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आली आहे. याच कार्यकाळात आर्टिकल ३७०, ट्रपल तलाक, राम मंदीर, नागरिकतेची व्याख्या, भारतीय पासपोर्टची वाढलेली पत या सर्व गोष्टी मोदींची सत्ता असतानाच्या दशकात झाल्या आहेत.
अमित शहा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत देखील मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अभ्यास करून बोलायचं झालं तर माझ्या मते आपल्या परराष्ट्र धोरणात कणखरपणाची कमतरता होती. नरेंद्र मोदींनी या परराष्ट्र धोरणाचा कणा मजबूत केला.'
अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सांगितलं, ते म्हणाले, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूप जवळून पाहत आलोय. त्यांची सर्वात महत्वाची क्षमता म्हणजे ते कोणत्याही भूमिकेत सहज मोल्ड होऊ शकतात. त्यांनी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ही त्यांची एक उत्तम क्वालिटी आहे.'