पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (दि.२२ जुलै) संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतामारामन यांनी मोदी सरकार काळातील आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 'खुर्ची वाचवा बजेट...' अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'खुर्ची वाचवा बजेट' असे एका वाक्यात वर्णन केले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे.
राहुल गांधी यांनी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर 'X' पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, 'अर्थसंकल्पात मित्रपक्षांना खुश करण्यात आले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत त्यांना पोकळ आश्वासने देण्यात आली आहेत. सामान्य भारतीयांना कोणताही दिलासा किंवा फायदा न देता मित्रपक्षांना खुश करून त्यांना शांत करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस सरकारचा जाहीरनामा आणि मागील बजेट आहे तसे कॉपी आणि पेस्ट करण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.