

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास संस्थेचे एक पथक आज (दि.२३) दाखल झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले असून, ते पथक जम्मू-काश्मीर पोलिसांना तपासात मदत करेल, असेही वृत्तात म्हटले आहे.
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा काश्मीरमध्ये पोहचले. त्यांनी दहशतवाद्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या भारतीयांच्या कुटुंबांची भेट घेत त्यांचे सात्वन केले. त्यानंतर या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर गृहमंत्री शाहा यांनी पहलगाम बैसरन कुरणात दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळी पोहोचत त्याठिकाणची पाहणी केली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली. भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही."