Delimitation Bill: परिसीमन विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी; 30 नोव्हेंबरला लोकसभेत विधेयक मांडणार, किती जागा वाढणार?

Delimitation Bill Women's Reservation: केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणासाठीच्या परिसीमन विधेयकातील महत्त्वाच्या बदलांना मंजुरी दिली आहे.
Delimitation Bill Women's Reservation
Delimitation Bill Women's ReservationPudhari
Published on: 
Updated on: 

Delimitation Bill Women's Reservation: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने परिसीमन प्रक्रियेद्वारे महिलांना आरक्षण देण्यासाठी आणण्यात येणाऱ्या संविधान दुरुस्ती विधेयकातील बदलांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

या प्रस्तावानुसार, सर्व राज्यांमधील जागांची संख्या समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही व्यवस्था २०५१ पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या जागांमध्ये वाढ होण्याबरोबरच महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्गही मोकळा होऊ शकतो.

Delimitation Bill Women's Reservation
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करताय? आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या नवे दर

दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून बोलावले आहे. या अधिवेशनात संबंधित विधेयक लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकातील बदलांना मंजुरी दिल्याने पुढील संसदीय प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Delimitation Bill Women's Reservation
Dhadkan 2: २६ वर्षांनंतर ‘धडकन २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला? अक्षय-शिल्पा चित्रपटातून बाहेर, सुनील शेट्टीच्या कॅमिओची चर्चा

या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यासंदर्भात पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात देशाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या रचनेत महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.