Miss World 2025: 'मला वेश्यासारखं वागवलं...'; भारतात होणाऱ्या स्पर्धेतून मिस इंग्लंडची माघार, जाणून घ्या काय आहे कारण?

Miss World contest | स्पॉन्सरना खूश ठेवण्याचा होता दबाव; मेला मॅगीचा खळबळजनक दावा
Miss World contest
Miss World contestPudhari Photo
Published on
Updated on

हैदराबाद : हैदराबादमध्ये सुरू असलेल्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेमधून मिस इंग्लंड 2024 'मेला मॅगी' (Milla Magee) यांनी वैयक्तिक आणि नैतिक कारणांचा हवाला देत स्पर्धेतून माघार घेतली. त्यांनी आयोजक आणि स्पर्धेतील वातावरणावर गंभीर आरोप केले असून, आपल्या अनुभवाविषयी सांगताना त्यांनी म्हटले की, "मला मिस वर्ल्ड स्पर्धेत वेश्या असल्यासारखे वाटले."

"स्पॉन्सरना खूश ठेवण्याचा होता दबाव " – 'मेला मॅगीचा दावा

24 वर्षांची मेला मैगी 7 मे रोजी भारतात आली होती. मात्र, 16 मे रोजी त्यांनी अचानक हैदराबाद सोडले आणि यूकेला परत गेल्या. ‘द सन’ या ब्रिटीश टॅब्लॉइडला दिलेल्या मुलाखतीत मेला मॅगी यांनी सांगितले की, त्यांना सक्तीने संपूर्ण दिवस मेकअपमध्ये ठेवण्यात आले, सतत बॉल गाऊन घालायला सांगण्यात आले आणि "मध्यमवयीन आर्थिक सहाय्यक स्पॉन्सर्स"सोबत घुलमिळ होण्याचा दबाव होता.

नैतिक दृष्टीकोनातून मी सहभागी नाही होऊ शकत

“मी इथे काही वेगळं करायला आले होते. मात्र, आम्हाला मदारीच्या माकडासारखं वागवण्यात आलं. नैतिकदृष्ट्या मी त्याचा भाग होऊ शकत नव्हते. गेस्टना खूश ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली जात होती. हे सगळं मला अत्यंत अपमानजनक वाटलं, असेही मेला मॅगी म्हणाल्या.

तेलंगणा सरकारकडून चौकशीची मागणी

या प्रकारानंतर तेलंगणाचे नेते के. टी. रामा राव यांनी यावर प्रतिक्रिया देत या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, महिलांवर अशा प्रकारचा दबाव हा पूर्णपणे निषेधार्ह आहे.

मिस वर्ल्ड संस्थेचा खुलासा – ‘आईच्या तब्येतीमुळे माघार घेतली’

मिस वर्ल्ड संस्थेच्या CEO जुलिया मोर्ले यांनी अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे की, मॅगीने स्पर्धा सोडण्याचा निर्णय त्यांच्या आईच्या तब्येतीमुळे घेतला. संस्थेने त्यांच्या परिस्थितीची समजूत घेऊन परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. तसेच निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, "यूकेमधील काही माध्यमांनी खोट्या आणि अपमानजनक बातम्या प्रकाशित केल्या असून त्या पूर्णपणे तथ्यहीन आहेत."

चार्लेट ग्रांट घेणार प्रतिनिधित्व

मॅगीच्या जागी आता मिस इंग्लंडची रनर-अप चार्लेट ग्रांट या स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतील. याच स्पर्धेत भारताकडून नंदिनी गुप्ता सहभागी झाल्या आहेत. नंदिनीने 2023 मध्ये मिस इंडिया किताब जिंकला असून त्या कोटा (राजस्थान) येथील रहिवासी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news