Crime News: जिम ट्रेनर हिंदू महिलांसोबत आधी मैत्री करायचे, मग शारीरिक संबंध अन् शेवटी..; 'जिम जिहाद' टोळीचा पर्दाफाश

जिमच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Crime News gym jihad up

वाराणसी: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे जिमच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कथित 'जिम जिहाद' प्रकरणाची गंभीर दखल घेत, उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह १० जिम चालकांवर कडक 'गँगस्टर ॲक्ट' अंतर्गत कारवाई केली आहे. या रॅकेटच्या माध्यमातून तब्बल ५० हून अधिक महिलांना जाळ्यात ओढण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिर्झापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा मुख्य सूत्रधार इम्रान खान याच्यासह १० आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून संबंधित सर्व जिम सील केल्या होत्या. सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत.

Crime News
Crime News: संतापजनक! गर्भवती पत्नीच्या गुप्तांगात हेक्सा ब्लेड खुपसून पतीने केली क्रूर हत्या

तपासात धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर, जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीने या आरोपींवर उत्तर प्रदेश गँगस्टर आणि समाजविघातक कृत्य (प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, आरोपींनी गुन्हेगारी कृत्यातून कमावलेली बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया आता पोलिसांनी सुरू केली आहे.

आधी मैत्री, मग आक्षेपार्ह व्हिडिओ आणि...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान खान आणि त्याचे साथीदार जिममध्ये येणाऱ्या हिंदू महिलांना व्यायामाचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढत असत. जिममधील महिलांशी जवळीक साधून आधी त्यांचा विश्वास जिंकला जायचा. शारीरिक संबंध प्रस्थापित करून महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केले जायचे. हे फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडून पैसे उकळले जायचे आणि त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जायचा.

या टोळीच्या कृत्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला १९ जानेवारी रोजी भारतीय न्याय संहिता, उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा आणि आयटी ॲक्ट अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता आता यात गँगस्टर ॲक्टची भर घालण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Crime News
Nashik Ashok Kharat Case | मुलांना ठार मारण्याची धमकी अन् वारंवार अत्याचार! नराधम अशोक खरातविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news